घरताज्या घडामोडीजगात लाट; मुंबईत घट, कोरोना रुग्णांची संख्या मार्चच्या तुलनेत

जगात लाट; मुंबईत घट, कोरोना रुग्णांची संख्या मार्चच्या तुलनेत

Subscribe

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. 25 नोव्हेंबरपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या मुंबईत सापडत असलेली रुग्ण संख्या ही मार्चमधील रुग्णसंख्येइतकी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे दुसर्‍या लाटेच्या भीतीच्या सावटाखाली वावरणार्‍या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना दिल्ली, राजस्थान, गोवा या राज्यांमध्येही पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली. त्यामुळे भारतामध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. त्यातच आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडू लागल्याने बाजारामध्ये गर्दी वाढू लागली. वाढती गर्दी, दिवाळीतील फटाक्यांचा धूर यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येऊ लागली. दिवाळीनंतर रुग्ण वाढू लागले होते. यामध्ये 20 ते 27 नोव्हेंबरदरम्यान एक हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली.

- Advertisement -

वाढती रुग्णसंख्या आणि दुसर्‍या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर महापालिकेने अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. पालिकेने कोरोना चाचण्यांचा वेग वाढत अधिकाधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली. परिणामी रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाली. 28 नोव्हेंबरपासून सातत्याने मुंबईतील रुग्ण संख्या ही 700 ते 800 च्या घरात आहे, तर पॉझिटिव्हीटीचा दरही 5.94 टक्क्यांवर आला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम हाती घेतल्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा घसरू लागली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही मार्च महिन्यातील रुग्ण संख्येच्या तुलनेत असल्याने मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. त्यामुळे आपण हर्ड इम्युनिटीकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने दुसरी लाट आली नाही. पण आपण संयम राखणे आवश्यक आहे.
– डॉ. अविनाश सुपे, अध्यक्ष, कोरोना मृत्यू विश्लेषण समिती

- Advertisement -

तारीख चाचण्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्हीटी
25 नोव्हेंबर 19018 1272 6.69
26 नोव्हेंबर 17973 1167 6.49
27 नोव्हेंबर 16902 1136 6.72
28 नोव्हेंबर 14592 922 6.32
29 नोव्हेंबर 10538 721 6.84
30 नोव्हेंबर 11706 758 6.48
1 डिसेंबर 16450 960 5.94
2 डिसेंबर 15399 880 5.71
3 डिसेंबर 15832 823 5.20
4 डिसेंबर 16394 825 5.03

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -