घरताज्या घडामोडीCentral Railway : मोटार वाहतुकीसाठी हाटेक रेल्वे कोच तयार

Central Railway : मोटार वाहतुकीसाठी हाटेक रेल्वे कोच तयार

Subscribe

मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपमध्ये फक्त ४५ दिवसांत हाय-स्पीड प्रोटोटाइप अत्याधुनिक कोच तयार करण्यात आला आहे.

रेल्वे मार्गाने दुचाकी आणि चारचाकी मोटार वाहनाची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपमध्ये फक्त ४५ दिवसांत हाय-स्पीड प्रोटोटाइप अत्याधुनिक कोच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑटोमोबाईल्स वस्तूंची वाहतूक करणार्‍या एनएमजीएच कोचची गती ७५ वरुन ११० किलो मीटर प्रतितास होणार आहे. तसेच आता रेल्वे डब्यातून वाहनाची वाहतूक सुरक्षित आणि जलद गतीने होणार आहे.

परळ कार्यशाळेत निर्मिती

देशात आणि बांगलादेशातही विविध ठिकाणी मोटार पाठविण्याकरिता रेल्वे ही सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक झाली आहे. मानके सुधारण्यासाठी, रेल्वे आणि ऑटोमोबाईल उत्पादक यांच्यात अलीकडेच  संवाद साधण्यात आला.  एंड ओपनिंग, डोर डिझाईन, फॉल प्लेट आणि कोच फ्लोर डिझाईन आणि लोडिंग व अनलोडिंग यासंबंधी सुधारणांसाठी निर्मात्यांनी दिलेल्या सूचना, ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या नवीन सुधारित गुड्स (एनएमजी) कोचमध्ये सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने आरडीएसओकडे पाठविल्या आहेत. वाहन उत्पादकांनी डब्याची तपासणीही केली आणि सुधारित डिझाइनबद्दल समाधान व्यक्त केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  संजीव मित्तल यांनी एनएमजी कोच रेकॉर्ड वेळेत बदल केल्याबद्दल टीम परळ कार्यशाळेचे कौतुक केले. तसेच मध्य रेल्वेचे प्रधान  मुख्य परिचालन व्यवस्थापक डी.के. सिंग म्हणाले की, एनएमजीएच ऑटोमोबाईल कॅरियरची वेगवान क्षमता ऑटोमोबाईलच्या जलद आणि सुरक्षित वाहतुकीत गेम चेंजर ठरेल.

- Advertisement -

फक्त ४५ दिवसात तयार केला कोच

मध्य रेल्वे परळ कार्यशाळेने ४५ दिवसांच्या कमी कालावधीत मोटार वाहून नेण्यासाठी एक प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे. त्यात ऑटोमोबाईल्सच्या सुलभ लोडिंगसाठी सुधारित फॉल प्लेट, वाहनांच्या  सुरक्षिततेसाठी लॅशींग चॅनेल्स, पूर्णतः वेल्डेड चेकर प्लेटचा पृष्ठभाग, वेंटिलेशनसाठी लोवर आणि नैसर्गिक पाईप लाईट इलिमिनेशनसह न्यू मॉडिफाइड गुड्स कोच (एनएमजीएच) विकसित करण्यात आले.  यामुळे एनएमजीएच डब्यांची वेग क्षमता ७५ वरून ११० किमी प्रतितास झाली आहे. आरडीएसओ आता या कोचची ऑसीलेशन चाचणी घेणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -