घरक्रीडाNZ vs WI : न्यूझीलंडचा विंडीजला व्हाईटवॉश

NZ vs WI : न्यूझीलंडचा विंडीजला व्हाईटवॉश

Subscribe

विंडीजने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि १२ धावांनी गमावला.

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरी फटका पुन्हा एकदा वेस्ट इंडिजला बसला. विंडीजने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि १२ धावांनी गमावला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजला २-० असा व्हाईटवॉश दिला. न्यूझीलंडच्या ४६० धावांचे उत्तर देताना विंडीजचा पहिला डाव केवळ १३१ धावांत आटोपला होता. त्यामुळे न्यूझीलंडने विंडीजला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर (६१) आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉश डा सिल्वा (५७) यांनी सातव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. परंतु, त्यांना इतरांची फारशी साथ न लाभल्याने विंडीजचा दुसरा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला.

त्याआधी या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४६० धावा केल्या होत्या. डावखुऱ्या हेन्री निकोल्सने अप्रतिम फलंदाजी करत १७४ धावांची खेळी केली होती. त्याला निल वॅग्नर (नाबाद ६६), विल यंग (४३) आणि डेरेल मिचेल (४२) यांनी उत्तम साथ लाभल्याने न्यूझीलंडने साडेचारशे धावांचा टप्पा पार केला. याचे उत्तर देताना विंडीजच्या पहिल्या डावात जर्मेन ब्लॅकवूडने ६९ धावांची खेळी केली होती. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पाही पार करता न आल्याने विंडीजचा पहिला डाव १३१ धावांत आटोपला होता. न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि कायेल जेमिसन यांनी ५-५ विकेट घेतल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -