घरक्रीडाIND vs AUS : विराट कोहलीला रोखण्यासाठी योजना तयार - लँगर

IND vs AUS : विराट कोहलीला रोखण्यासाठी योजना तयार – लँगर

Subscribe

कोहलीला पहिल्या कसोटीत मोठी खेळी न करू देण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे.  

भारताचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीला मोठ्या धावा करण्यापासून रोखण्यासाठी आमच्या गोलंदाजांनी योग्य ती योजना आखल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. कोहली पितृत्व रजेवर जाणार असल्याने केवळ अ‍ॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाईट) होणाऱ्या पहिल्या कसोटीतच खेळणार आहे. त्यानंतर तो मायदेशी परतेल. मात्र, कोहलीला या सामन्यात मोठी खेळी न करू देण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे.

कोहली फारच उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तितकाच उत्कृष्ट कर्णधार आहे. मला त्याच्याविषयी खूप आदर आहे. भारतीय संघासाठी तो कर्णधार आणि फलंदाज म्हणून खूप महत्वाचा असल्याचे मला ठाऊक आहे. त्यामुळेच त्याला रोखण्यासाठी आमची योजना तयार आहे. परंतु, आम्ही योजनेनुसार खेळणे गरजेचे आहे. तसे झाले तरच आम्ही त्याला धावा करण्यापासून रोखू शकतो. आम्ही आता कोहलीविरुद्ध खूप क्रिकेट खेळले आहे आणि त्यानेही आमच्याविरुद्ध खूप क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्याला अडचणीत टाकण्यासाठी काय करावे लागते हे आम्हाला माहित असल्याचे लँगर म्हणाले.

- Advertisement -

कोहलीशी हुज्जत घातल्यास तो त्याचा खेळ अधिक उंचावतो असे म्हटले जाते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात त्याच्याशी काहीही न बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही कोहलीला कसे बाद करायचे याविषयी चर्चा करतो. तो फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याशी हुज्जत घालून किंवा त्याला काही बोलून, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. खेळ हा भावनेने खेळला जातो, पण आम्हाला आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असेही लँगर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -