घरताज्या घडामोडीमलनिःसारण वाहिन्यांतील पाण्यात कोरोना, पण नागरिकांना धोका नाही

मलनिःसारण वाहिन्यांतील पाण्यात कोरोना, पण नागरिकांना धोका नाही

Subscribe

आयसीएमआरच्या अहवालावर पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र दुसरीकडे पब, नाईट क्लबमधील तरुणांच्या विनामास्क धिंगाण्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच मुंबईतील मलनिःसारण वाहिन्यांमधील पाण्यात कोरोनाचा व्हायरचा (विषाणू) आढळून आल्याची धक्कादायक बाब ‘आयसीएमआर’च्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी सदर अहवाल आपण पाहिलेला नाही आणि तो अहवाल जुना असू शकेलं, मात्र मुंबईकरांना त्यापासून कोणताही धोका नसल्याचे सूतोवाच केले आहे. तसेच, मुंबईकरांना घाबरण्याचे कारण नाही.

मुंबईकरांना सदर प्रकारामुळे कुठेही धोका संभवत नाही

कोरोनाचा व्हायरस जरी एखाद्या वेळी मलनिःसारण वाहिन्यांमधील पाण्यात आढळून आलेला असेल तरी ते पाणी कोणीही पिण्यासाठी वापरत नाही किंवा त्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. त्या पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत आहे. तसेच, समुद्राचे ते खारट पाणी कोणीही पीत नाही. वास्तविक पाहता, कोरोनाचा व्हायरस हा नाका, तोंडावाटे शरीरात प्रवेशित झाला तरच त्याची बाधा होते हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे मुंबईकरांना सदर प्रकारामुळे कुठेही धोका संभवत नाही, असेही या अधिकार्याने सांगितले.

- Advertisement -

मुंबईतील सहा ठिकाणी केला सर्व्हे

मुंबईतील मलनिःसारण वाहिन्यांमधील पाण्यात सहा ठिकाणी नमुने गोळा करून त्याची तपासणी आणि चाचणी केली असता त्यामध्ये कोरोनाचे व्हायरस आढळून आल्याचे ‘आयसीएमआर’च्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्व्हे करून त्याठिकाणच्या मलनिःसारण वाहिनीमधील पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यामध्ये, १६ मार्चपूर्वी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र ११ ते १६ मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना व्हायरस आढळून आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या मलामधून कोरोनाचा व्हायरस हा मलनि:सारण वाहिनीमध्ये जातो. याच मलनि:सारण वाहिन्यांत सफाई काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. कारण की, मलनि:सारण वाहिन्यात कोरोनाचा व्हायरस जिवंत राहतो, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्या अधिकाऱ्याने, सफाई कर्मचाऱ्यांची पालिकेतर्फे नियमित तपासणी करण्यात येते. त्यांना प्राधान्याने उपचार दिले जात आहेत. मात्र त्या कर्मचाऱ्यांना त्या व्हायरसची बाधा होण्याची शक्यता फारच कमी आहे. जरी बाधा झाली तर ती १% पेक्षा जास्त नसेल, असे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पैसे द्या, औषधे न्या – स्थानिक औषध वितरक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -