घरमनोरंजनशेवंताचे पाटणकर येतायत 'नेलपॉलिश' घेऊन

शेवंताचे पाटणकर येतायत ‘नेलपॉलिश’ घेऊन

Subscribe

कायद्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमातून 'शेड्स ऑफ लॉ' म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कांगोरे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. येत्या १ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येणार आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अण्णा आणि शेवंता तर सगळ्यांच्याच लक्षात असेल. अण्णा, शेवंता, पांडू यांच्यासोबत प्रेक्षकांच्या मानत राहिलेली व्यक्तिरेखा म्हणजे पाटणकर. मालिकेतील शेवंताचे साधे सरण पाटणकर आता ‘नेलपॉलिश’ घेऊन एका हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. पाटणकर थेट बॉलिवुडमध्ये पोहचले आहेत. पाटणकरांची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता अधिश पायगुडे हा ‘नेलपॉलिश’ या बॉलिवुड सिनेमात दिसाणार आहे. अधिश अभिनेता अर्जुन रामपालसोबत बॉलिवुड सिनेमाच्या पडद्यावर झळकरणार आहे. येत्या १ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येणार आहे.

‘कायद्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमातून ‘शेड्स ऑफ लॉ’ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कांगोरे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सिनेमात काम करणे हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. सिनेमातील कालाकारांसोबत काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या’, असे सिनेमा आणि त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना अधिशने सांगितले.

- Advertisement -

कॉलेजमध्ये असल्यापासून अधिशने पुरूषोत्तम करंडक, फिरोदिया यासारखे अनेक व्यासपीठ गाजवले आहेत. अधिशने इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. कलेची आवड असल्याने नोकरी सोडून तो अभिनयाकडे वळला. अधिश अभिनयासोबतच लेखनही करतो. जाऊ द्या ना बाळासाहेब, एक हजाराची नोट,तुंबाड,मेकअप यासांरख्या अनेक मराठी सिनेमातून अधिशने अभिनय केला आहे. या सगळ्यात रात्रीस खेळ चाले या मालिकेने अधिशला नवी ओळख मिळवून दिली. मालिकेतील पाटणकर ही व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा क्षेत्रांत आपल्या कलेचा दमदार ठसा उमटवल्यानंतर आता हा मराठमोळा अभिनेता नेलपॉलिश या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल, मानव कौल, मानव तिवारी, रजित कपूर यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते उद्घाटन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -