घरमुंबईशिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या; प्रभारींच्या खांद्यावरील भार केला कमी

शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या; प्रभारींच्या खांद्यावरील भार केला कमी

Subscribe

प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कायमस्वरुपी उपसंचालक मिळाले आहेत.

अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील बदल्या थांबवलेल्या असल्याने बहुतेक पदांवर प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून असंतोष व्यक्त करण्यात येत होता. मात्र ठाकरे सरकारने शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. त्यामुळे प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कायमस्वरुपी उपसंचालक मिळाले आहेत.

राज्यातील नऊ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बहुतांश कार्यालयाचा जबाबदारी ही अनेक वर्षे प्रभारी उपशिक्षण संचालकांच्या खांद्यावर होती. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकाचा पदभार अनेक वर्षे शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्याकडे होता. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी शिक्षक संघटना व शिक्षकांकडून करण्यात शिक्षण विभागाकडे करण्यात येत होत्या. परंतु भाजप सरकारच्या काळामध्ये शिक्षण विभागामध्ये कोणत्याही बदल्या करण्यात न आल्याने त्यांच्याकडे हे पद कायम राहिले होते. परंतु नुकतेच अहिरे यांच्याकडील पदभार काढून तो उत्तर मुंबई विभागाचे शिक्षक निरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तसेच औरंगाबद विभागीय निरीक्षकपद हे सुद्धा प्रभारींच्याच खांद्यावर होते. मात्र बुधवारी केलेल्या बदल्यांमध्ये प्रभारी जबाबदार्‍या दूर करत मुंबई विभागीय उपसंचालकपद राज्य मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांच्याकडे सोपवली. तर औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कारभार अनिल साबळे, पुणे शिक्षण उपसंचालक पदी औदुंबर उकिरडे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी वैशाली जामदार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी गणपत मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य मंडळाच्या नाशिक विभागीय सचिवपदी राजेंद्र अहिरे, लातूर विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग, मुंबई विभागीय सचिवपदी सुभाष बोरसे, पुणे विभागीय सचिवपदी अर्चना कुलकर्णी यांची निवड करण्यात आल आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या उप आयुक्तपदी हारुण आत्तार, शैलजा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -