घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेवर उद्या 'नाईट मेगाब्लॉक'

मध्य रेल्वेवर उद्या ‘नाईट मेगाब्लॉक’

Subscribe

कल्याण-डोंबिवली येथे जुन्या वीज वाहिन्यांचे जाळे काढण्यासाठी रात्री २ ते ३ या दरम्यान मध्य रेल्वेवर मेघाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर २९ ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली येथे जुन्या वीज वाहिन्यांचे जाळे काढण्यासाठी रात्री २ ते ३ दरम्यान मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाईल. या मेगाब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल केला जाणार आहे.

मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांच्या वेळांमध्ये बदल

चेन्नई-सीएसएमटी पंजाब मेल, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस या गाड्या कर्जत-पनवेल मार्गावरुन वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या कल्याण स्थानकातील प्रवाशांना दिवा येथे थांब देण्यात येणार असून या गाड्या सुमारे १५ मिनिटे उशीराने धावणार आहेत.

- Advertisement -

या ठिकाणी देण्यात येणार थांबा

मुझ्झरपूर-एलटीटी आणि अमृतसर-सीएसएमटी या एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा देण्यात येणार असून गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसला टिटवाळा येथे थांबा दिला जाणार आहे. तर पंढरपूर-सीएसएमटी गाडीला दादर येथे अंतिम थांबा देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -