घरट्रेंडिंगबॉलिवूडचा फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेची झाली 'साईशा'

बॉलिवूडचा फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेची झाली ‘साईशा’

Subscribe

ज्या दिवशी मी ब्रा आणि हाय हिल्य घातल्या त्या दिवसानंतर माझे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. याआधी मी फक्त चार भिंतीच्या आत आणि बाथरूममध्ये महिलांचे कपडे घालायचे. आता मी ते सर्वांच्या समोर घालू शकते

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मराठमोळा स्वप्निल शिंदे याने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. स्वप्निलने त्याच्या लिंगबदलाची शस्रक्रिया करून स्वत:चे नाव आता सायशा शिंदे असे ठेवले आहे. सायशा गेली अनेक वर्ष या क्षणाची वाट पाहत होती. मात्र २०२०च्या लॉकडाऊनमध्ये सायशाची शस्रक्रिया पार पडली. स्वप्निलने नव्या वर्षात त्याचे नवे रूप त्याच्या चाहत्यासमोर आणले आहे. स्वप्निलने आपण ट्रान्सवुमन झाल्याचा खुलसा सोशल मीडियावरून केला आहे. स्वत:ची नवी ओळख करून देताना स्वप्निलने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘शाळा कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले माझ्या वागण्यावरून त्रास द्यायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. माझ्या मनावर अनेक आघात व्हायचे. जे अस्तित्व माझे नाही ते जगताना मला खूप गुदमरल्यासारखे व्हायचे. वयाच्या वीसाव्या वर्षी मी स्वत:चे सत्य स्वीकारले आणि तेव्हा मी खऱ्या अर्थाने मुक्त झाले. आधी मला मी समलैंगिक आहे असे वाटले, मात्र सहा वर्षापूर्वी मी समलैंगिक नसून ट्रान्सवुमन आहे असे समजले’,अशी भावूक पोस्ट स्वप्निलने लिहिली आहे.

- Advertisement -

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींचा फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्ष स्वप्निल लिंग परिवर्तनाच्या शस्रक्रियेसाठी प्रयत्न करत होता. एका मुलाखतीत स्वप्निलने सांगितले की, ‘शस्रक्रियेनंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलले आहे. ज्या दिवशी मी ब्रा आणि हाय हिल्य घातल्या त्या दिवसानंतर माझे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. याआधी मी फक्त चार भिंतीच्या आत आणि बाथरूममध्ये महिलांचे कपडे घालायचे. आता मी ते सर्वांच्या समोर घालू शकते’, असे स्वप्निलने सांगितले.

- Advertisement -

गेली अनेक वर्षे स्वप्निल बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. सहा वर्षांपूर्वी स्वप्निलला आपल्या काही वेगळेपण आहे याची प्रामुख्याने जाणीव झाली. त्याच वेळी त्याच्या नव्या प्रवासाची सुरूवात झाली होती. सहा वर्षापूर्वी त्याला असे कळले की मी ट्रांन्सवुमन आहे. मी पुरूष नाही तर माझ्या शरिरात बाई लपलेली आहे. मला माझ्या आतील भावना दाबून ठेवता येत नाहीय. मला ट्रांन्सवुमन म्हणून ओळखले जावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून अनेक वेळा शस्रक्रियेचा विचार केला. तु हँडसम आहेस तु मुलगी होऊ नकोस असे मला वारंवार सांगण्यात येत होते. मला समाजाची भीती दाखवली गेली. परंतु लॉकडाऊनचा काळ माझ्यासाठी स्पेशल ठरला आणि माझी शस्रक्रिया झाली. आता माझा नवीन जन्म झाला आहे , असे स्वप्निलने सांगितले.


इतका धाडसी निर्णय घेणे सोपे नसते. या सगळ्यात स्वप्निलचे आई वडिल त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. स्वप्निल हा सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. आई वडिलांना जेव्हा त्याने हि गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला. डॉक्टर शोधण्यापासून, नाव बदलल्यानंतर प्रॉपर्टी पेपर्सवरिल नावे बदलण्यापर्यंत त्यांनी मला सगळ्या गोष्टीत मदत केली. त्यांचे हे वागणे बघून मलाही आश्चर्य वाटले, असे स्वप्निले सांगितले आहे.


हेही वाचा – सलमान खानचा एक सल्ला आणि कश्मीराला झालं जुळं

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -