घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवत साधला संवाद

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवत साधला संवाद

Subscribe

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाला भेट दिली. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याची पाहणी करुन निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी थांबवण्याच प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गेली ३५ वर्ष शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट दिली. गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
गोसेखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी या जाणून घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की विकासाची कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. नाग नदीमुळे प्रदूषण होणार नाही यादृष्टीने नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

‘उधार‘राजाचे जाहीर आभार; फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविदर्भ दौऱ्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. “मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!” अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -