घरक्रीडाTest Rankings : स्मिथने टाकले कोहलीला मागे; विल्यमसन नंबर वन  

Test Rankings : स्मिथने टाकले कोहलीला मागे; विल्यमसन नंबर वन  

Subscribe

पुजाराला दोन स्थानांची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानी पोहोचला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला दोन स्थानांची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीत स्मिथने १३१ आणि ८१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्या खात्यात ९०० गुण आहेत. तसेच या कसोटीत ९७ धावा करणाऱ्या रिषभ पंतला १९ स्थानांची बढती मिळाली. आता तो २६ व्या स्थानावर आहे. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (९१९ गुण) अव्वल स्थानावर आहे.

भारताचा कर्णधार कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला. त्यामुळे त्याला तीन कसोटी सामन्यांना मुकावे लागले असून याचा फायदा स्मिथला झाला आहे. कोहली आता ८७० गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून चौथ्या स्थानावरील मार्नस लबूशेनचे ८६६ गुण आहेत. त्याने भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत चांगला खेळ केल्यास तो कोहलीला मागे टाकू शकेल. फलंदाजांत कोहलीसह अजिंक्य रहाणे आणि पुजारा हे टॉप टेनमध्ये आहेत.

- Advertisement -

गोलंदाजांमध्ये भारताच्या अश्विनची नवव्या आणि जसप्रीत बुमराहची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. अश्विन आणि बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून अनुक्रमे १२ आणि ११ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०८ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -