घरट्रेंडिंग'कमलम' खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

‘कमलम’ खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

Subscribe

ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आहेत. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होता.

भारतात अनेक प्रकारची फळे आहेत. काही फळे आपल्या देशात पिकतात तर काही फळे दुसऱ्या देशातून मागवावी लागतात. ड्रॅगन फ्रूट हे फळ आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल. गुजरातचे मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून ‘कमलम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ भारतात तयार होणारे फळ नाही परंतु त्याचा चांगला स्वाद आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे यामुळेड्रॅगन फ्रूटला भारतात सर्वात जास्त मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आहेत. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होता. दररोज एका ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने एक्टिव राहण्यास मोठी मदत होते. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने एंटी ऑक्सीडेंट, विटामीन सी, प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेड असते जे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी मदत करतात. भारतातीय बाजारपेठात ड्रॅगन फ्रूडची किंमत ५०० ते ६०० रूपये किलो आहे. जाणून घ्या ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे.

ड्रॅगन फ्रूट (कमलम) खाण्याचे फायदे

  • ड्रॅगन फ्रूटहे इम्युनिटी बुस्टर आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. शरीरात होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचण्यासाठी ड्रॅगन फ्रूट मोठी मदत करते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासा मोठी मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि फायबर असते त्यामुळे शरीर स्वास्थ चांगले राहण्यास मदत होती.
  • ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी ड्रॅगन फ्रूटचे सेवन करणे कधीही उत्तम. डाएटमध्ये ड्रॅगन फ्रूटचा समावेश करणे कधीही योग्य. ड्रॅगन फ्रूटमध्ये ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी एसिड असते ज्यामुळे शरीर स्वास्थ चांगले राहण्यास मोठी मदत होते.
  • कॅन्सरसारख्या आजारावर ड्रॅगन फ्रूट परिणामकारक ठरते. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले एंटी ऑक्सीडेंट हे फ्रि रेडीकल्स पासून तयार होणारे कॅन्सर सेल्स तयार करण्यासाठी मोठी मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये क्रोटीन एंटी कार्सिनोजेनिक घटक ट्यूमर सारख्या आजारापासून बचावासाठी मोठी मदत करतात.
  • ब्लड शुगर असणाऱ्यांना ड्रॅगन फ्रूटचे सेवन करणे कधीही उत्तम. शुगर लेवल कमी करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट मोठी मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे डायबिटिज असणाऱ्यांनी योग्य प्रमाणातच ड्रॅगन फ्रूट खाणे कधीही उत्तम. ड्रॅगन फ्रूट खाताना त्यांच्या बाहेरील भाग खाऊ नये. या भागात अनेक किटाणू असतात. ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -