घरदेश-विदेशअमेरिकन राष्ट्रपतींच्या भाषणाचे भारतीय कनेक्शन, जाणून घ्या

अमेरिकन राष्ट्रपतींच्या भाषणाचे भारतीय कनेक्शन, जाणून घ्या

Subscribe

नवनिर्वाचित राष्ट्रपतींसाठी भारतीय-अमेरिकन व्यक्तीने लिहिले भाषण

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा आज राष्ट्रपती पदासाठी शपथविधी समारंभ पार पडणार आहे. जे बिडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती म्हणून जो बिडेन शपथ घेतील. जो बिडेन आपल्या शपथविधीदरम्यान अमेरिकेतील देशवासियांना संबोधणार आहेत. यादरम्यान आपल्या संबोधनातून देशवासियांना एकजूटीचा संदेश देणार असल्याचे बोलले जात आहे. असे एका सल्लागाराने म्हटले आहे. भारतीय वेळानुसार रात्री १० वाजता जो बिडेन राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. अमेरिकेच्या वेस्ट फ्रंट कॅपिटल येथे हा शपथविधी सोहळा होणार आहे. बिडेन लवकरच देशवासियांना संबोधित करतील. बिडेन यांच्या भाषणाशी भारताचेही खास नाते जोडले गेले आहे. कारण जो बिडेन जे भाषण देणार आहेत. ते भारतीय वंशाचे-अमेरिकन निवासी विनय रेड्डी यांनी लिहिले आहे.

जो बिडेन आपल्या भाषणातून सर्व अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचतील, आणि प्रत्येक अमेरिकन नागरिकांना देशासमोरील आव्हानांविरोधात लढा देण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन करणार आहेत. जो बिडेनच्या सल्लागारांच्या मते हे भाषण २०-३० मिनिटांचे असू शकते आणि त्याचा विषय ‘अमेरिका युनायटेड’ असेल. या ऐतिहासिक भाषणात, बिडेन आपल्या कार्यकाळात अमेरिकन लोकांसह कार्य करण्याबद्दल आपली दृष्टी आणि अपेक्षा सांगतील. नवनिर्वाचित राष्ट्रपतींनीदेखील आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते की, जर अमेरिका एकजूट राहिली तर हा देश अशक्य असे काहीही करु शकतो.

- Advertisement -

डिसेंबरमध्ये सोपविण्यात आली होती जबाबदारी

मागील वर्षी डिसेंबरमध्ये बिडेन यांनी भारतीय वंशाचे -अमेरिकी रहिवासी विनय रेड्डी यांना भाषण लेखक म्हणून ठेवले होते. ओहियोच्या डेटनमध्ये लहाणाचे मोठे झालेले, रेड्डी हे पहिले भारतीय-अमेरिकन व्यक्ती आहेत ज्यांना राष्ट्रपती पदावरील व्यक्तीचे भाषण लेखक म्हणून नियुक्त केले गेले आहे. यापूर्वी, रेड्डी हे बिडेन यांच्या कार्यकाळात २०१३ ते १७ या काळात अध्यक्ष होते. विनय रेड्डी बिडेन-हॅरिस हे निवडणूक प्रचारासाठी ज्येष्ठ सल्लागार व भाषण लेखक देखील होते.

डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती नसणार 

अमेरिकेचे मावळते राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. शपथविधी सोहळ्यापूर्वी ट्रम्प व्हाइट हाऊस सोडून फ्लोरिडा येथे जातील. तथापि, असे करणारे ट्रम्प हे पहिले आउटगोइंग अध्यक्ष नाहीत. त्याआधीही नवनियुक्त राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला बरेच मावळते राष्ट्रपती उपस्थित नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -