Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ऑस्करच्या शर्यतीत सयानी गुप्ताच्या 'शेमलेस'ची एंट्री

ऑस्करच्या शर्यतीत सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची एंट्री

Related Story

- Advertisement -

कलाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर पुरस्कारा’च्या शर्यतीत बॉलिवुड अभिनेत्री सयानी गुप्ता आणि हुसेन दलाल यांच्या ‘शेमलेस’ चित्रपटाची एंट्री झाली आहे. यंदा ९३ व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वाधिक भारतीय चित्रपटांना स्थान मिळाले आहे. यात आता ‘शेमलेस’चे स्थानही निश्चित झाले आहे. बहुचर्चित ‘शेमलेस’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या ट्रेलरला सोशल मिडियावर देखील तुफान प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता हुसैन दलाला एका वेगळ्या भूमिकेत दर्शवण्यात आले आहे. जो सतत फूड डिलिव्हरी सर्विसवाल्यांकडून खाण्यासाठी काही न काही ऑर्डर करत असतो तरी त्यांचे समाधान होत नाही. या ट्रेलरमधून चित्रपटाची नेमकी कथा स्पष्ट होत नाही. परंतु या चित्रपटाने ऑस्करमध्ये स्थान निश्चित केल्याने बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटातील अनन्या पांडे, राजकुमार राव, सिद्धांथ चतुर्वेदी, ऋतिक रोशन आणि आयुष्मान खुराना सारख्या बड्या कलाकारांमुळे चित्रपट अगदी भव्यदिव्य होणार आहे. या कलाकारांनी इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाबद्द्ल काही न काही शेअर केले आहे. अनन्या पांडेसह ऋतिक रोशननेही स्टोरी शेअर करत लिहिले की, सादर करत आहोत, शेमलेशचा ट्रेलर, गुड लक सर्वांना. तर आयुष्याम खुरानाने ट्रेलर शेअर करत काय कमाल ट्रेलर आहे, राजकुमार रावच्या संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा.

- Advertisement -

 

- Advertisement -