घरमहाराष्ट्रकोणाची किती लग्न, किती मुले सांगू का?

कोणाची किती लग्न, किती मुले सांगू का?

Subscribe

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा हिने मागे घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण शांत होईल असे वाटत असले तरी विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सोमवारी थेट धमकीच देऊन टाकली. कोणाला किती मुले आणि कोणाची किती लग्न झाली होती ते सांगू का?, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

या विरोधकांना आता काय म्हणावे, एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचे आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नसल्याच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जे काही धनंजय मुंडे यांना सांगायचे होते ते त्यांनी सांगितले आहे. मग जर रेकॉर्ड पहायचे झाले तर अनेकांनी काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुले होती आणि कोणाची किती लग्न झाली आणि कोणाचे लग्न झाले नव्हते. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता, असे अजित पवार म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीचे ऑडिट झाल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. त्यानंतर सरकार, उद्योगपती यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याविषयीची पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -