घरताज्या घडामोडीFarmers’ Protest Live Updates: हिंसाचार करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई होणार- दिल्ली पोलीस 

Farmers’ Protest Live Updates: हिंसाचार करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई होणार- दिल्ली पोलीस 

Subscribe
हिंसाचार करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई होणार- दिल्ली पोलीस

दिल्लीतील पाच भागातील इंटरनेट सेवा रात्री १२ पर्यंत बंद, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल और मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. काही आंदोलक आपापल्या सीमांवर परतत आहेत. पण लाल किल्ल्यावर आंदोलकांचा जमाव अजूनही कायम आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केलं


दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री अतिम शहा यांनी तातडीचे बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

- Advertisement -

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने दिल्लीतील इंटरनेट आणि टेलिकॉम सेवा बंद करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. आज रात्री १२ वाजेपर्यंत दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी हिंसा केली नाही. भाजप सरकारच्या दिल्ली पोलिसांनी हिंसा केली : अशोक ढवळे


आंदोलन शांततामय वातावरणातच सुरु राहिल. आंदोलक शांततेत माघारी परततील. ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आंदोलनात कोणतीही हिंसा होणार नाही, अशी माहिती राकेश टीकैत यांनी दिली.


आंदोलनाला हिंसक वळण मिळताच दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद


शेतकरी आंदोलकांची संख्या अधिक असल्याने आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपयशी, शांततापूर्ण आंदोलनाला आक्रमक स्वरुप


शेतकरी आंदोलक दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात दाखल, शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण


दिल्लीत पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या


सिंघू बॉर्डरवरुन ट्रॅक्टर परेडला सुरुवात, टिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी तोडले बॅरिगेट्स.


दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला, पोलिस शेतकऱ्यांमध्ये झटापट


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -