घरलाईफस्टाईलपाणी कमी पिल्याने किडनी होईल फेल

पाणी कमी पिल्याने किडनी होईल फेल

Subscribe

शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असणे गरजेची

हिवाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी असते. किंवा थंडीमुळे शरीरातील घाम जात नसल्याने अनेकांना तहान लगेच लागत नाही. परंतु थंडी असो वा उन्हाळा शरीरात प्रमाणात पाणी असणे रोग्यासाठी गरजेच आहे. कारण पाणी पिण्याचे प्रमाण अचानक कमी झाल्यास शरीरात डिहायड्रेशनचा (dehydration) त्रास जाणवू लागतो. तसेच किडनी, मेंदू, त्वचा अशा अनेक अवयवांवर याचा थेट परिणाम दिसतो.

 

- Advertisement -

मेंदू

 

 

- Advertisement -

डिहायड्रेशनमुळे (म्हणजे अचानक घाम येणे, उलटी) शरीरात इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण वाढते. ज्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. इलेक्ट्रोलाइट पोटेशियम आणि सोडियमसारखे द्रव जे शरीरातील पेशींना सिग्नल देण्याचे कार्य करतात. परंतू जर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण देखील कमी होते. ज्यामुळे शरीरातील पेशींना सिग्नल देणारी यंत्रणेचे कार्य बिघडते  त्यामुळे मासपेशी ताणल्या जातात आणि याचा थेट परिमाम मेंदूवर होतो.

 

मांसपेशी

 

 

ज्यावेळी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यावेळी शरीरातील पेशी मेंदूला संदेश पाठवतात व त्यामुळे आपल्याला तहाण लागली याची जाणिव होते. तथापि डिहायड्रेशनचा परिणाम थेट मेंदूवर होतो. आणि त्यामुळे आपली कार्यक्षमता व मूड बिघडतो. अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या मासिकाच्या मते, शरीरात केवळ 2 टक्के जरी डिहायड्रेशन वाढले तरी त्याचा थेट परिणाम आपल्या कामावर होतो. ज्यामुळे आपण कोणतेही काम मनापासून करु शकत नाही.  तसेच स्मरमशक्ती कमी होते.

 

किडणी

 

 

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा पेशी हायपोथालेमसला सिग्नल पाठवतात. ज्यामुळे व्हॅसोप्रेसिन नावाचा संप्रेरक सोडला जातो. याला अँटीडायरेक्टिक हार्मोन (एडीएच) म्हणून देखील ओळखले जाते. हा संप्रेरक किडणीला रक्तातील कमी पाणी काढण्यासाठी सूचित करतो. ज्यामुळे लघवी कमी, जाड आणि गडद रंगाची होते. किडणी हे रक्त शुद्धकरणाचे मुख्य फिल्टर असते. त्यामुळे पुरेसे पाणी किंवा द्रव न घेता ते शरीरातील विषारी द्रव काढू शकत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपली मूत्रपिंड (किडणी) दिवसात 55 गॅलन द्रव वाहून नेण्याइतकी सक्षम असते. अधिक काळ तहानलेले राहिल्यास किडणीचे कार्य बिघडते. व किंडणी निकामी होऊ शकते. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडणीला मोठ्य़ाप्रमाणात दुखापत होऊन किडणी विकार होण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील पाण्याच्या कमीमुळे किडणी स्टोन आजार होऊ शकतो. .मेयो क्लिनिकच्या मते, जे लोक गरम, कोरड्या हवामानात राहतात त्यांना इतरांपेक्षा खूप जास्त घाम घेतात, अशा लोकांमध्ये हा धोका जास्त आढळतो.

 

रक्तदाब

 

 

शरीरात रक्त तयार करण्यासाठी द्रवपदार्थाची म्हणजेच पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा शरीरात द्रवाची कमतरता असते तेव्हा रक्ताची पातळी देखील कमी होते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ स्टीफनस्की यांच्या मते, ‘शरीरात योग्यप्रमाणात रक्तदाब टिकवण्यासाठी पुरेश्य़ा द्रवपदार्थाची आवश्यक आहे.’ शरीरात पाण्याअभावी हायपोटेन्शन किंवा कमी रक्तदाब असल्याची तक्रार येऊ शकते आणि यामुळे ती व्यक्ती बेशुद्धही होऊ शकते.

 

सेक्स ड्राइव्ह

 

 

यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, डिहायड्रेशनची तीव्र स्थितीमुळे हायपोव्होलेमिक शॉक सारख्या आपत्कालीन परिस्थितीस निर्माण होऊ शकते. जेथे रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि  रक्ताअभावी  ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पसरु शकत नाही, ज्यामुळे बरेच अवयवांचे कार्य थांबू शकते. डॉक्टर बुश म्हणतात की यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, डोळ्यांवर दबाव, सेक्स ड्राईव्ह गमावणे किंवा झोप येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

पचनसंस्था 

 

 

शरीरातील पाण्याची कमी असल्यास त्याता थेट विपरित परिणाम पचन यंत्रणेवर होतो. कारण पचन कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात पुरेश्या पाण्याची आवश्यकता असते. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जाते आणि पचनाचे कार्य योग्यरितीने होते. स्टीफनस्की म्हणतात, “शरीरात द्रवपदार्थ म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम शौच प्रक्रियेवर होत.

 

त्वचा

 

 

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. पाण्याअभावी त्वता कोरडी, रुकष दिसू लागते. ओठ फूटतात. त्यामुळे सुंदर, निरोगी, नितळ त्वचा ठेवण्यासाठी शरारीत पाण्याची खूप आवश्यकता असते.

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -