घरमहाराष्ट्रग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत सुरत-नाशिक प्रवास आता दोन तासांत

ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत सुरत-नाशिक प्रवास आता दोन तासांत

Subscribe

आढावा बैठक : जिल्ह्यातील सहा तालुके जोडणार

समृद्धी महामार्गानंतर आता नाशिकच्या दळणवळण व्यवस्थेला गती देण्यासाठी भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत ‘ग्रीन फिल्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे नाशिक ते सुरत आणि नाशिक ते चेन्नई अंतर कमी होणार आहे. जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून जाणार्‍या या महामार्गाच्या भूसंपादनासाठी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर १२५० किलोमीटरवर येणार आहे, तर नाशिक-सुरत दरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहे. हैदराबाद येथील आर्वी असोसिएट्स आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी नेमकी किती जमीन संपादित होणार, घरे, झाडे, विहिरी, किती ठिकाणी वनविभागाची जमीन जाणार, याबाबतचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

असा आहे मार्ग

सुरत-चेन्नई : १२५० किलोमीटर, वेळ : १० तास
नाशिक-सुरत : १७६ किलोमीटर, वेळ : २ तास
नाशिक-चैन्नई : ८ तास

असा जाणार महामार्ग

सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नुल-कडप्पा-चेन्नई
(गुजरात-महाराष्ट्र-कर्नाटक-तामिळनाडू-आंध्र प्रदेश-तेलंगणा)

- Advertisement -

नाशिकच्या या तालुक्यांतून जाणार मार्ग

सुरगाणा – बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, राक्षसभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ.
दिंडोरी – तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बु., जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबे दिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर.
पेठ – पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.
नाशिक –  आडगाव, ओढा, विंचुर गवळी, लाखलगाव.
निफाड – चेहडी खु., चाटोरी, वर्‍हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी.
सिन्नर – देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बु., धारणगाव, फर्दापूर, पांगरी बु., भोकणी, पांगरी खु., फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -