घरक्रीडाफोनवर 'या' दोघांची फलंदाजी पाहत होतो, तेवढ्यात...; विराटने सांगितला तो किस्सा

फोनवर ‘या’ दोघांची फलंदाजी पाहत होतो, तेवढ्यात…; विराटने सांगितला तो किस्सा

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी रुग्णालयात असतानाचा एक किस्सा शेअर केला आहे. विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर होती म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत बॉर्डर-गावस्कर टॉफीवर पुन्हा एकदा भारताचं नाव कोरलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली नवख्या खेळाडूंना घेऊन ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. गाबा कसोटीत वॉशिंग्टन सूंदर आणि शार्दुल ठाकूर भारताच्या या दोन गोलंदाजांनी दमदार फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मायदेशात परतलेला विराट कोहली देखील या दोघांच्या फलंदाजीचा आनंद घेत होता. याची माहिती विराट कोहलीने दिली.

विराट कोहलीने सांगितलं की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फलंदाजी मी आणि अनुष्का बघत होतो. तेवढ्यात डॉक्टरने आम्हाला बोलावलं. कोहली म्हणाला, “मला आठवतं जेव्हा शार्दुल आणि वॉशिंग्टन ब्रिस्बेनमधील शेवटच्या कसोटीत चांगली भागीदारी करत होते, तेव्हा मी माझ्या फोनवर सामना पाहत होतो. तेवढ्यात डॉक्टरने बोलावलं. त्यांची फलंदाजी पाहून मला खूप आनंद झाला आणि अभिमान वाटतो ऑस्ट्रेलियामध्ये संपूर्ण संघाने चांगली कामगिरी बजावली.”

- Advertisement -

चेन्नईत शुक्रवारपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कोरोना काळातील भारतातील ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आहे. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा संघात दाखल झाला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -