घरताज्या घडामोडीFarmer Protest : सचिन तेंडुलकरचा भारतरत्न काढून घ्या - संभाजी ब्रिगेड, पहा...

Farmer Protest : सचिन तेंडुलकरचा भारतरत्न काढून घ्या – संभाजी ब्रिगेड, पहा व्हिडिओ

Subscribe

सचिन तेंडूलकरने शेतकऱ्यांच्या पाठीत खंबीर खुपसत, भाजपची दलाली केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सचिनने केंद्र सरकारचे समर्थन केल्यानेच सचिनवर टीकेची झोड उडाली आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने सचिनला लक्ष्य करत सचिनचा भारतरत्न काढून घ्या अशी मागणी केली आहे. भाजप समर्थनाचा हा करंटेपणा सेलिब्रिटी जमातीमध्ये दिसून आलेला आहे. शेतकऱ्याने जर शेतात नाही पेरल तर सेलिब्रिटी काय खाणार असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. जर शेतकऱ्यांनी पेरा केला नाही, तर सेलिब्रिटी काय धतोरा खाणार का असेही संभाजी ब्रिगेडने विचारले आहे. नुसत्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांपुरते हे आंदोलन मर्यादित नसून संपुर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आणि देशातील मजुर, कामगारांसाठीचे हे देशव्यापी आंदोलन आहे असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काळा कायदा केला आहे, त्या काळ्या कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. सचिनने शेतकऱ्यांच्या बाजूने न बोलता केंद्र सरकारच्या बाजूने बोलल्याने सचिनची तुलना ही कुंभकर्ण म्हणून करण्यात आली आहे. संतोष शिंदे प्रभाग संघटक, संभाजी ब्रिगेड यांनी एक फेसबुक व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून सचिनच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. (Sambhaji Brigade demand to take back Bharatratna from sachin tendulker)

सचिन तेंडुलकर जो गेले सहा वर्षे कुंभकर्णासारखा झोपला होता, कधीही संसदेत उपस्थित राहिला नाही, त्याने एक चकार संसदेच्या सभागृहात मांडला नाही. सचिनसारखे लोक जर जगाच्या पोशिंद्याच्या बाबतीत बोलत असतील तर हा करंटेपणा असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. भारतात संघाच्या लोकांची चापलूसी करायची आणि भारतरत्नसारखे पुरस्कार घ्यायचे. म्हणूनच सचिन तेंडुलकरचा भारतरत्न मागे घ्याला हवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. सचिनच्या मुलालाही यापुढच्या काळात भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार, त्याचवेळी खऱी मेहनत घेणारी मुले मागे पडतात. कारण आपल्या मुलांसाठी वशीला सचिनकडून लावण्यात येईल असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. अदाणी, अंबानीसोबतचे यांचे काय संबंध आहेत हे आम्हाला भविष्यात दिसतील. असा करंटेपणा भारतात आणि महाराष्ट्रात राहून करणार असतील तर त्यांना जागा दाखवू अशा शब्दातला समाचार संभाजी ब्रिगेडने सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या वक्तव्यावर घेतला आहे.

- Advertisement -

 

सचिन तेंडुलकर यांना दिलेला #भारतरत्न काढून घ्या…!

Posted by Santosh Shinde – संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र on Thursday, February 4, 2021

 

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या समर्थनात आपले मत व्यक्त करणाऱ्या पॉप सिंगर रिहानाला संभाजी ब्रिगेडने हॅट्स ऑफ केले आहे. कंगनाला मात्र शेतकऱ्यांबाबतची दया नाही. ती शेतकऱ्यांना बोलत असेल तर तिचा बंदोबस्त करावा लागेल. शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि सन्मानार्थ उभे राहणार असे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -