घरताज्या घडामोडीबेबो गेली बाळाचे चेकअप करायला अन् फोटो झाले व्हायरल

बेबो गेली बाळाचे चेकअप करायला अन् फोटो झाले व्हायरल

Subscribe

पाहा करीना कपूर खान आणि सैफ अली खानचे व्हायरल फोटो

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान रूटीन चेकअपसाठी क्लिनिकलमध्ये जाताना सतत दिसत आहे. माहितीनुसार, या महिन्यात करीना कपूर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे ती अलीकडेच दुसऱ्या बाळाच्या स्वागताआधी चेकअप करायला गेली होती. त्यावेळेसचा तिचा कॅज्युअल लूक चांगलांच चर्चेत आला आहे. तसेच तिची त्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. चेकअपच्या वेळी कोरोनाचे भान ठेवून करीनाने मास्क लावलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मापूर्वीच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. आपण पाहतोय की, करीना गरोदर असल्यापासून अनेक जाहिरातीचे काम करताना दिसत होती. तसेच काही दिवसांपूर्वी बहीण करिश्मा कपूरसोबत देखील फोटोशूट केले होते. पण आता तिने काही महिन्यांपूर्वीच काम करणे बंद केले आहे. सध्या करीना संपूर्ण वेळ आपल्या बाळाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहे. माहितीनुसार करीना आणि सैफ त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. दुसऱ्या बाळाला योग्य स्पेस मिळण्याकरीता सैफने आधीपासून मोठं घर विकत घेतलं होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

- Advertisement -

करीनाच्या दुसऱ्या प्रेग्नसीनंतर सैफ अली खान पॅटर्निटी लीव्ह घेणार असून तो जास्तीत जास्त वेळ नवजात बाळाला आणि कुटुंबियाला देणार आहे. मुलांना मोठे होताना पाहू शकत नसलो तर ती सर्वात मोठी आपली चूक असल्याचे सैफ अली खानचे मत आहे. दरम्यान सैफ अली खानला करीनासोबत अनेक वेळा पाहिले गेले आहे. त्यावेळी प्रत्येकदा सैफसोबत पोलिसांची सुरक्षा होती. कारण ‘तांडव’ वेबसीरिजच्या वादामुळे पोलीस सुरक्षा घेण्याची वेळ सैफ अली खानवर आली होती. या वादामुळे सीरिजच्या टीमला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे सैफच्या सुरक्षितेमध्ये वाढ करण्यात आली होती.


हेही वाचा – ‘या’ कारणामुळे राजीव कपूर होते राज कपूर यांच्यावर नाराज

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -