घरक्रीडा...म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डू प्लेसिसने घेतली कसोटीतून निवृत्ती 

…म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डू प्लेसिसने घेतली कसोटीतून निवृत्ती 

Subscribe

डू प्लेसिसने ६९ कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डू प्लेसिसने ६९ कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना ४१६३ धावा केल्या. मात्र, पुढील दोन वर्षांत दोन टी-२० वर्ल्डकप होणार असल्या कारणाने डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ‘पुढील दोन वर्षांत दोन टी-२० वर्ल्डकप होणार आहेत. त्यामुळे आता मी टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मला जगभरातील विविध टी-२० स्पर्धा खेळायचे आहे. त्यामुळे माझ्या टी-२० खेळात अधिक सुधारणा होईल,’ असे डू प्लेसिस म्हणाला.

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानास्पद

डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळत राहणार आहे. ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १५ वर्षांपूर्वी मला जर कोणी सांगितले असते की मी दक्षिण आफ्रिकेकडून ६९ कसोटी सामने खेळेन आणि नेतृत्व करेन, तर मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता,’ असे ३६ वर्षीय डू प्लेसिस निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला.

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्ये १० शतके

डू प्लेसिसने २०१२-१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने ७८ आणि नाबाद ११० धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. डू प्लेसिसने एकूण ६९ कसोटी सामने खेळले आणि त्यात ४० च्या सरासरीने ४१६३ धावा केल्या. यात १० शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -