घरमहाराष्ट्रस्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी

स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी

Subscribe

 पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी गेल्याच समोर आले आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या बळीचा आकडा अकरावर पोहचला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी गेल्याच समोर आले आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या बळीचा आकडा अकरावर पोहचला आहे. ३२ आणि ५२ वर्षीय पुरुषांचा त्यात समावेश आहे. दोघांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जानेवारी पासून शहरात ६९ रुग्ण आढळले,पैकी अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जानेवारी ते जून दरम्यान एकच रुग्ण दगावला होता. तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाल्हेकरवाडी आणि अजमेर वसाहत येथील ५२ वर्षीय पुरुषाला २४ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले होते तर येथील ३२ वर्षीय पुरुषाला ३१ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आजच्या स्थितीत शहरात एकूण स्वाईन फ्ल्यूचे २३ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ४ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यूविषयी धास्ती वाढली आहे.परंतु महानगर पालिका याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी देखील ६१ जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता.


तळेगाव दाभाडेमध्ये अनाथाश्रम जेवणातून 30 मुलींना विषबाधा

पुणे | तळेगावमध्ये 8 ते 10 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील ही घटना असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं बोललं जात आहे. जेवण झाल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊ लागली तर काहींना उलट्या ही झाल्या. 30 मुलींपैकी 8 ते 10 मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,रात्रीच्या जेवणातून आश्रमातील 30 मुलींना उलटी,चक्कर तसेच मळमळ होऊ लागल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अद्याप याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या 30 मुलींपैकी 20 मुलींची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित 10 मुलींचे अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. भवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलींना लवकरच घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टर म्हणाले. डॉ. अरुण जावरी, डॉ. विवेक भटकळ, डॉ. प्रफुल काशीद यांनी मुलींना ताबडतोब उपचार केले.याप्रकरणी अद्यापही तळेगाव पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

लोहगाव विमानतळाच्या नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी

पुणे  | लोहगाव विमानतळाचा विस्तार करण्याबरोरच सुविधा वाढवण्यात येत आहेत. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असून विमानतळावर प्रसाधनगृह उभारणीपासून ते टर्मिनलच्या विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. याचाच एक भाग असलेल्या लोहगाव विमानतळाच्या नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्राधिकरणाकून देण्यात आली. शहरात दिवसेंदिवस हवाई वाहतूक करणार्‍यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर नवनव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे देशभरातील महत्त्वाच्या विमानतळांवर विविध विकासकामे करण्यात येत आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. यामध्ये विमानतळच्या विस्तारीकरणासाठी अत्यंत उपयोगी ठरणार्‍या नवीन इंटीग्रेटेड टर्मिनलची निविदा मंजूर झाली असून आय.टी.डी सेमेन्टेशन इंडिया लिमिटेड या कंपनीला 358.89 कोटींना हे काम देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -