घरटेक-वेकशाओमी फोनचे नवे फिचर भारतात लॉन्च

शाओमी फोनचे नवे फिचर भारतात लॉन्च

Subscribe

शाओमीच्या Redmi 6A ची किंमत ५ हजार ९९९ पासून सुरु होते. यामध्ये कमीत कमी २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असा पहिला पर्याय आहे. तर Xiaomi Redmi 6A का दुसरा फोन ६ हजार ९९९ रुपयांचा असून यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरीचा पर्याय आहे.

स्वस्त आणि मस्त अशी ओळख असलेल्या शाओमीने नुकतेच रेडमी ६ सीरीजचे तीन फोन लॉन्च केले. आणि आता शाओमीने एक नवं फिचर भारतात लाँच केले आहे. फेस अनलॉक नावाचे हे नवे फिचर असून Redmi 6A, Redmi 6 आणि Redmi 6 Pro या तीन नव्या फोनमध्ये हे फिचर असणार आहे. हे नवे फिचर नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे शाओमी फोनच्या चाहत्यांना आता या नव्या फिचरचा आनंद घेता येणार आहे.

काय आहे नवं फिचर?

AI (आर्टिफिशिअल इंटलिजंस) फेसअनलॉक नावाचे फिचर असून कमी प्रकाशातही तुम्हाला फेस अनलॉक फिचर वापरता येणार आहे. Redmi 6A, Redmi 6 आणि Redmi 6 Pro या तीन नव्या फोनमध्ये हे फिचर असणार आहे.

- Advertisement -

काय आहे खास?

फेस अनलॉक फिचर नवे नाही. पण शाओमीची खासियत त्याची किंमत आहे. स्वस्त आणि मस्त अशी खासियत असलेल्या या फोनच्या किमती बजेटमध्ये आहेत. इतक्या कमी किंमतीच्या फोनमध्ये महागड्या फोनप्रमाणे फिचर असल्यामुळेच शाओमी अनेकांच्या पसंतीला उतरलेला आहे. आता या नव्या फोनमध्ये देखील त्यांनी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.

काय आहे फोनची किंमत

शाओमीच्या Redmi 6A ची किंमत ५ हजार ९९९ पासून सुरु होते. यामध्ये कमीत कमी २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असा पहिला पर्याय आहे. तर Xiaomi Redmi 6A का दुसरा फोन ६ हजार ९९९ रुपयांचा असून यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरीचा पर्याय आहे. यात काळा, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू अशा रंगांचे पर्याय आहेत. या किंमती फोनची विक्री सुरु झाल्यानंतर २ महिन्यांसाठी असणार आहे. १९ सप्टेंबर रोजी या फोनची विक्री सुरु होणार असून ऑनलाईन वेबसाईटवर याची विक्री करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -