घरमहाराष्ट्रनाशिकमारहाणीत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मारहाणीत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

उमराणे गावात मागील भांडणाची कुरापत काढून तिघांना लाकडी दांड्याने केली होती मारहाण

देवळा तालुक्यातील उमराणे गावात मागील भांडणाची कुरापत काढून तिघांना लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेत गंभीर जखमी महिलेवर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीराबाई सुखदेव अहिरे असे मृत महिलेचे नाव आहे.

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी फिर्यादी तात्याजी बंडू आहिरे (५३, रा. शुभारंभ रो-हाऊस, हॅपीहोम कॉलनी, बंगला क्र. ६ द्वारका, नाशिक) यांना आरोपी प्रकाश मालजी मोरे (रा. झगडी पाडा, उमराणे), कृष्णा ताराचंद आहिरे (रा. मेशी, ता. देवळा) व केशव निंबा आहिरे (रा. डोंगरगाव, ता. देवळा) यांनी मागील भांडणाची कुरापत काढून प्रकाश मोरे याने लाकडी दांडक्याने तात्याजी आहिरे यांना डोक्यात मारहाण करून जबर जखमी केले होते. तसेच, केशव आहिरे यांनी फिर्यादीची पत्नी यशोदाबाईंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची मेहुणी मीराबाई आहिरे मोटरसायकलवर जात असताना कृष्णा आहिरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मागून ठोसा मारून खाली पाडत  गंभीर जखमी केले होते. तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. शनिवारी (दि.२७) सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची माहिती देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर आणि खंडेराव भवर यांनी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -