घरमुंबई'स्वच्छ शिवडी, सुंदर शिवडी' उपक्रमाला वारली पेंटिंगचा साज!

‘स्वच्छ शिवडी, सुंदर शिवडी’ उपक्रमाला वारली पेंटिंगचा साज!

Subscribe

पालिकेच्या मूकबधिर कर्मचाऱ्याने ही सुंदर चित्रे रेखाटली आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ शिवडी, सुंदर शिवडी’ हा उपक्रम हळूहळू आकाराला येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत शिवडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या ३००-३५० फूट लांब भिंतीवर आदिवासी समाजाचा वारसा जपणारी वारली पेंटिंग रेखाटण्यात येत आहे. त्यामुळे या उपक्रमाला वारली पेंटिंगचा एक अनोखा साज असणार आहे. विशेष म्हणजे ही वारली पेंटिंग मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने काढली आहेत. या चित्रकाराचे निशांत श्रीपाद पारकर असे नाव असून तो मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयात मलनि:सारण विभागात कार्यरत आहे. निशांत हा मूकबधिर असला तरी त्याने काढलेली चित्रे खूप काही बोलून जातात. त्याने समाजसेवेचा ध्यास म्हणून कोणताही मोबदला न घेता ही चित्रे साकारली आहेत.

१५ दिवसांचा कालावधी

शिवडीला स्वच्छ व सुंदर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमात अनेक नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवेक, कलाकार आदींसह पालिका कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक खासदार, आमदार आदींचे मोठे सहकार्य मिळत आहे, असे नगरसेवक सचिन पडवळ म्हणाले. बिडीडी चाळ क्र. ५ ते शिवडी रेल्वे टिकीट घरापर्यंत ३००-३५० फूट लांब भिंतीवर वारली पेंटिंग काढण्यात येत आहे. या पेंटिंगला किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -