घरताज्या घडामोडीपवारांच्या बाबतीत '१२' आकडा येतो कुठून - सुधीर मुनगंटीवार

पवारांच्या बाबतीत ‘१२’ आकडा येतो कुठून – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

गुजरात क्रिकेट स्टेटिअमने सरदार पटेल स्टेडिअमला नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरसोबत केली. मंत्रीमंडळ बैठकीत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मान्यता दिली. शरद पवार मोठे नेते आहेत. मोदींनी बारामतीला जाऊन गुणगौरव केला. गाय व म्हैसकरिता रोजगार हमी योजनेत सहा गुरांचा गोठा १२ गुरांचा केला. एखादा मोठा कार्यक्रम केला. १२ आकडा दिला कुठून येतो ? मला कळत नाही असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान केला. योजनेचं भाषणही १२ पानांचे असल्याचे आमदार सुनिल प्रभू यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणात राज्य सरकारच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांना एकंदरीतच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आपल्या भाषणाच्या निमित्ताने केला. ( Maharashtra legislative assembly 2021, sudhir mungantivar slams government over sharad pawar scheme )

राज्यात पेट्रोलच्या दरांच्या मुद्द्यावरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात पेट्रोल ९० रूपयांना विकले जात आहे. पण केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्ही सरकारला हे पैसे जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या वाट्याला ९० रूपयांमधील ४० रूपये येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. जीएसटीच्या मुद्द्यावरही राज्य सरकारकडून होणाऱ्या परताव्याच्या रकमेची माहिती देत त्यांनी सांगितले की केंद्राकडे राज्याची जी रक्कम आहे ती सुरक्षित आहे. ही रक्कम राज्याला थेट मिळते. पण काही रक्कम सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडे असते ही बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. राज्यात कोरोना काळात सुरू असलेल्या खाजगी चाचण्यांचा भ्रष्टाचारदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिला. एअऱपोर्टवर कोरोनाच्या काळात सरकारी चाचण्यांएवजी खाजगी चाचण्यांच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी लक्ष वेधले. क्रिकेटपटूंना कोरोनाची चाचणी करण्यापासून शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर सवलत देण्यात येते. पण माझी शरद पवारांची ओळख नाही. म्हणूनच दिल्लीतून येताना माझी गैरसोय झाली. चाचणीसाठी द्यायला पैसे नसल्यानेच मी याबाबत राजेश टोपे आणि मुंबई महापालिकेला याबाबतची विचारणा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

अजितदादांसोबतची मैत्री फक्त ७२ तासांची

अनिल देशमुख यांना मैत्रीचा दाखला देतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी अजितदादांसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. अजितदादा आणि आमची मैत्री ७२ तासांची होती असे मुनगंटीवार म्हणाले. दादांनी योग्य मार्गावर चालण्यासाठीची वाट दाखवणे हेच दोस्ती शब्दात आहे. बेईमानीच्या तत्वावर हे सरकार आले. बारामतीचे संशोधन मी वाचले या संशोधनात बटाटे आणि टॉमेटो एकाच झाडावर आणता येत असे संशोधन मी वाचले. त्यामुळे दक्षिण उत्तर ध्रुव एकत्र आणता येतात हे बारामतीकर करू शकतात असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -