घरक्रीडाIND vs ENG : कर्णधार कोहलीने साधली महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी 

IND vs ENG : कर्णधार कोहलीने साधली महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी 

Subscribe

इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना कोहलीसाठी खास ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला. कोहलीचा हा भारतीय कर्णधार म्हणून ६० वा कसोटी सामना असून त्याने भारताचा महान यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीनेही ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले होते. धोनी कर्णधार असताना भारताने ६० पैकी २७ कसोटी सामने जिंकले होते. मात्र, धोनीचा हा विक्रम कोहलीनेच मोडला होता.

६० कसोटीत २० शतके

कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ५९ पैकी ३५ कसोटी सामने जिंकले असून १४ सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला आहे. तर १० कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. तसेच कर्णधार असताना कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांत ५३९२ धावा केल्या असून यात २० शतकांचा समावेश आहे.

- Advertisement -

कर्णधार रूटचा ५० वा कसोटी सामना

अहमदाबाद येथे होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, बेन स्टोक्स (५५) आणि डॅन लॉरेन्स (४६) वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट या डावात केवळ ५ धावा करू शकला. कोहलीप्रमाणेच रूटसाठीही हा कसोटी सामना खास आहे. इंग्लंडचा कर्णधार म्हणून रूटचा हा ५० वा कसोटी सामना आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -