घरक्रीडाNZ vs AUS : ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा अनोखा विक्रम; रोहित, गेलच्या यादीत...

NZ vs AUS : ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा अनोखा विक्रम; रोहित, गेलच्या यादीत स्थान 

Subscribe

'ही' कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने ५५ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. फिंचने या खेळीत चार षटकार मारत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा तो एकूण सहावा फलंदाज आहे. या यादीत अव्वल स्थानी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल असून त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३५ षटकार मारले आहेत.

रोहित, गेलच्या यादीत स्थान

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा रोहित शर्मा (१२७ षटकार) दुसऱ्या स्थानावर असून त्याखालोखाल इंग्लंडचा इयॉन मॉर्गन (११३ षटकार), न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो (१०७ षटकार) आणि वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (१०५ षटकार) यांचा क्रमांक लागतो.

- Advertisement -

डेविड वॉर्नरला मागे टाकले

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा फिंच हा ऑस्ट्रेलियाचा एकमेव फलंदाज असून टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही तो अव्वल स्थानी आहे. त्याने ७० सामन्यांत २३१० धावा केल्या असून यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने अव्वल स्थान पटकावताना डेविड वॉर्नरला मागे टाकले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -