घरमनोरंजनअमिताभ बच्चन FIAF पुरस्काराचे भारतातील पहिले मानकरी

अमिताभ बच्चन FIAF पुरस्काराचे भारतातील पहिले मानकरी

Subscribe

अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार १९ मार्चला सन्मानित करणार आहेत.

बॉलीवूडचे शेहनशहा , महानायक, बिग- बी अमिताभ बच्चन यांनी नुकतेच चित्रपटसृष्टीत येऊन अर्धशतक पार केले आहे. त्यांनी या चित्रपटसृष्टीत खूप मेहनत घेतली. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना लवकरच मिळणार आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ बिग बींच्या मेहनतीचे कौतुक करणार आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ हा चित्रपटसृष्टीतला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ हा पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार पटकावणारे भारतातील पहिले अभिनेते आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन हे अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार १९ मार्चला सन्मानित करणार आहेत.

दरवर्षी हा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्क येथे साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या सावटामुळे संपूर्ण जग थांबले होते. याशिवाय, अनेक कामे रखडली आहेत. म्हणूनच हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडणार आहे. शिवाय नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया पार पडली, त्यामुळे त्यांनी कुठे जाणेही अशक्य होते.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्याशी संवाद साधताना बिग बी म्हणाले की, जीवनात खूप संघर्ष आहे. त्यावर हरिवंशराय बच्चन म्हणाले की, जीवनच संघर्ष आहे. हाच विचार मनात ठेवत त्यांनी आजतागायत चित्रपटसृष्टीत अमाप यश मिळवले. याच मेहनतीचे फळ म्हणजे त्यांना पदोपदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील सन्मानित केले होते. पडद्यावरील संकटाचा सामना जसा बिग बींनी केला तसाच सामना खऱ्या आयुष्यातही एखाद्या नायकाप्रमाणे केला. या जीवन संघर्षाचा सामना करत ते चित्रपटसृष्टीतील ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ हा पुरस्काराचे भारतातील पहिले अभिनेते ठरले आहेत.


हेही वाचा – महापालिका कर्मचार्‍याचा मुलगा अपघातात ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -