घरताज्या घडामोडीसचिन वाझेंची १० महिन्यांची वादग्रस्त कारकीर्द

सचिन वाझेंची १० महिन्यांची वादग्रस्त कारकीर्द

Subscribe

१७ वर्षे पोलीस विभागापासून दूर केले गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे निलंबन रद्द करून जून २०२० मध्ये पुन्हा पोलीस दलात रुजू करण्यात आले होते. वाझे यांना मुंबई गुन्हे शाखेत दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे सीआययूचे प्रभारी पद देण्यात आले आणि त्यांच्याकडे महत्त्वाच्या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता. मात्र अल्पवधीतच त्यांची कारकिर्दीला अंबानी प्रकरणात ब्रेक लागले आणि त्यांच्यावर दहा महिन्यात निलंबनाची कारवाई करण्याची वेळ मुंबई पोलीस दलावर आली आहे.

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शनिवारी रात्री उशिरा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. रविवारी वाझेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १० दिवसांची म्हणजे २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनआयएने रविवारी चौकशीसाठी सीआययूतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांच्या सह ४ अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये एक चिठ्ठी मिळून आली होती. या चिठ्ठीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा सीआययूचे प्रभारी सचिन वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र इतर तपास यंत्रणा देखील या गुन्ह्याचा तपास करीत असतांना या ‘जैश उल हिंद’ या दशतवादी संघटनेने या प्रकरणाची जवाबदारी स्वीकारल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केंद्रातून करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी रात्री जैश उल हिंद या संघटनेचे दुसरे पत्र व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून आम्ही असे कुठलेही पत्र पाठवले नसल्याचे या संघटनेने दुसऱ्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर ५ मार्च रोजी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे संशयास्पद अवस्थेत मिळून आला होता. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे हा गुन्हा तपासासाठी एटीएसकडे देण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेली कारचा तपास अधिकृतरित्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या तपासात संशयाचे सर्व धागेदोरे पोलीस अधिकारी यांच्याकडे जात असल्यामुळे अखेर शनिवारी रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना चौकशीकामी बोलावून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली. रविवारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयात एनआयएने १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

सीआययूच्या अधिकाऱ्याकडे चौकशी

अंबानी स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणाचा सर्वात प्रथम तपास करणारे सीआययू पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांच्यासह ४ अधिकाऱ्यांना चौकशीकामी रविवारी एनआयए कार्यालयात बोलवण्यात आले असून त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

मुख्यालयातून इनोव्होवा कार हस्तगत

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी स्कॉर्पिओ कार पार्क करताना या स्कॉर्पिओ कारच्या मागे असणारी इनोव्होवा कार एनआयएच्या पथकाने शनिवारी मुंबई पोलीस मुख्यलयातून ताब्यात घेतली आहे. ही इनोव्होवा कार सीआययूचे पथक वापरत असल्याचे समोर आले आहे.

वाझेचे निलंबन

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणी एनआयएकडून अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबनाच्या कारवाईचे आदेश आज काढण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे हे दुसऱ्यांदा निलंबित होणारे अधिकारी असणार आहे. ख्वाजा युनूस प्रकरणात १६ वर्षांपूर्वी निलंबित झालेले वाझे दुसऱ्यांदा निलंबित होतील.


हेही वाचा – सचिन वाझेंना या प्रकरणात अडकवण्यात आलंय, भाऊ सुधर्म वाझेंची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -