घरमनोरंजनFilmfare Awards : ६६ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर

Filmfare Awards : ६६ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर

Subscribe

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे.

दरवेळेस फिल्मफेअर मिळवण्यासाठी असंख्य चित्रपट उत्सुक असतात. ६६ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चे नामांकन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगण, सुशांत सिंह राजपूत आणि इरफान खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून नामांकन देण्यात आले होते. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना रनौत आणि तापसी पन्नू यांपैकी कोणाला नामांकन करण्यात येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लादले गेले होते. याशिवाय संपूर्ण चित्रपटसृष्टी लॉकडाऊनमध्ये पूर्ण एक वर्ष ओस पडली होती. त्यामुळे चित्रपटगृहाऐवजी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनाही लॉकडाउनमुळे या ओेटीटी प्लॅटफॉर्मची सवय झाली. ६६ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२१ सोहळा हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मऐवजी टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. या ६६ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, संवाद, पटकथा यासह सर्व श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये छपाक, तान्हजी, पंगा , गुलाबो सितीबो, थप्पड,  गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल, लूडो या चित्रपटांना नामांकन करण्यात आले आहे. त्यासोबतच खाली नमूद केलेल्या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्कार
सुशांत सिंह राजपूत (दिल बेचारा)
अजय देवगन ( तान्हाजी : द अनसंग वॉरियर)
अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)
इफरान खान ( अंग्रेजी मिडियम)
राजकुमार राव ( लूडो )

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार
दीपिका पादुकोण (छपाक)
विद्याबालन (शंकुतला देवी)
तापसी पन्नू (थप्पड)
जान्हवी कपूर (गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल)
कंगना रनौत (पंगा)


हेही वाचा – वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून लेडी सिंघमची गोळी झाडून आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -