घरमुंबईफोन टॅपिंग अहवाल लीक, अज्ञाताविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

फोन टॅपिंग अहवाल लीक, अज्ञाताविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

Subscribe

मुख्यमंत्री रश्मी शुक्लांवर कारवाई करतील - जितेंद्र अव्हाड

फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंबईच्या सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला याबाबत आता चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला एसआयडी प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत अल्यापासून काही गृहमंत्र्यांसह काही मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एक अहवाल लीक झाला असून विरोधकांनी या अहवालावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

रश्मी शुक्ला (एसआयडी) प्रमुख असताना फोन विनापरवानगी काही मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. या फोन टॅपिंगचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केला असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यांचे फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. याच अहवालाच्या आधारावर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपने या अहवालावरुन राज्य सरकार पोलीसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

राज्या गुप्त विभाग, मुंबई यांनी तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभाग येथील गोपनिय पत्र व इतर तांत्रिक गोपनिय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. याकरिता कलम ३० भारतीय टेलीग्राफ अॅक्ट १८८५,सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब) ६६ सह The Official secrets act, 1923 च्या कलम ५ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग,गुन्हे शाखा मुंबई करीत आहे.

मुख्यमंत्री रश्मी शुक्लांवर कारवाई करतील

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्काळ कारवाई करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगुलपणाचा रश्मी शुक्ला यांनी गैरफायदा घेतला असल्याचेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर कारावाई व्हावी असे राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांची मागणी आहे. हा सरकारला बरबाद करण्याचा कट होता असे साधारण सर्व राज्यमंत्रिमंडळाचे मत असल्याचेही गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांनी अहवाल लीक केला – फडणवीस

फोन टॅपिंगचा अहवाल हा नवाब मलिक यांनी लिक केला. अनेक पत्रकारांनी तो अहवाल मला पाठवला. हा अहवाल मलुक यांनी पाठवला, असं मला सांगितला. त्यामुळे हा अहवाल नवाब मलिक यांनी पब्लिक करण्याचं काम केलं.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -