घरमुंबईमुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू, रात्री ८ नंतर फिरण्यास बंदी

मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू, रात्री ८ नंतर फिरण्यास बंदी

Subscribe

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयाअंतर्गत उद्या रविवारपासून मुंबईत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

पालिकेने दिलेल्या गाईडलाईननुसार, ज्या सोसायट्यांमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळतील ती सोसायटी सील केली जाणार आहे. तसेच झोपडपट्टी व चाळींपेक्षांही अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इमारतींमध्ये आढळत आहेत. यादरम्यान मुंबईत पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -