घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच! ५८,९९३ नवीन रुग्ण

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच! ५८,९९३ नवीन रुग्ण

Subscribe

शुक्रवारी राज्यात ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. परंतु, शुक्रवारी पुन्हा हा आकडा वाढलेला दिसला. शुक्रवारी राज्यात ५८ हजार ९९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२ लाख ८८ हजार ५४० झाली असून राज्यात सध्या ५ लाख ३४ हजार ६०३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

३०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

शुक्रवारी राज्यात ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ५७ हजार ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी ४५ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाख ९५ हजार १४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९६ टक्के इतके आहे.

- Advertisement -

मुंबईत ९२०२ नवे रुग्ण 

मुंबईत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला दिसला. शुक्रवारी मुंबईमध्ये ९२०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ५ लाख ०१ हजार १८२ इतकी झाली आहे. तसेच शुक्रवारी कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण ११ हजार ९१६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -