घरताज्या घडामोडीमेडिकलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार - अमित देशमुख

मेडिकलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार – अमित देशमुख

Subscribe

आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दहावीची आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून दहावीची जून महिन्यात आणि बारावीची मे महिन्याच्या अखेरीस परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यानंतर आता इतर परीक्षांबाबत देखील निर्णय घेतले जात आहेत. मेडिकलच्या अंतिम वर्षाचा परीक्षा वेळेवरच होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या परीक्षांबाबत ७२ तासांत निर्णय होणार आहे. हा निर्णय राज्यपाल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चर्चेनंतर घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

माहितीनुसार अमित देशमुख यांनी व्हिसीच्या माध्यमातून वैद्यकीय शासकीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही. पण याबाबत राज्यपाल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चर्चेनंतर पुढच्या ७२ तासांत आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान नॅशनल मेडिकल काउंसिलने अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळवर घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसारच अंतिम वर्षाच्या परीक्षेच आयोजन होणार आहे. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांच्या मागणीबाबत ज्या काही अडचणी आहेत, त्याबाबत चर्चा करू ७२ तासांत निर्णय घेऊ, असे अमित देशमुखांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


हेही वाचा – MBBS उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरकार घेणार मदत – अमित देशमुख

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -