घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील कोरोनापरिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. मुंबईतील रुग्णालय, कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयातील बेड रुग्णांनी भरले आहेत. गेल्या २४ तासात मुंबईत ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ७० हजार ८३२ झाली आहे. यामधील ८७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणे मृतांचा आकडाही वाढतो आहे.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ५२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी मुंबईत कोरोनावर ६ हजार ६१७ रुग्णांनी मात केली आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ८२ टक्के आहे. मुंबईत एकूण ४७ हजार २५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत एकूण ४ कोटी ८ लाख ९९ हजार ५ कोरोना चाचण्या करण्यात दिल्या आहेत.

गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक वाहनांसाठी कलर कोड

मुंबईत फिरणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना तीन कलरमध्ये विभागले आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाडीला लाल रंग देण्यात आला आहे. तर भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना पिवळा रंग देण्यात आला आहे. तर या कर्मचाऱ्यांना आपल्याला देण्यात आलेल्या रंगाचा ६ इंच गोल सर्कल स्टिकर लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीसांकडून याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या मार्गदर्शक सूचना सीआरपीसी १४४ अंतर्गत जारी केल्या जाणार आहेत. सर्व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना कलर कोड देण्यात येणार असून, कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल तसेच गाडीतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेतला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच या निर्णयाचा कोणी गैरफायदा घेतंय का याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -