घरक्रीडाIPL 2021 : माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण! धोनीला बाद करणाऱ्या त्याच्या चाहत्याची...

IPL 2021 : माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण! धोनीला बाद करणाऱ्या त्याच्या चाहत्याची खास पोस्ट

Subscribe

आयपीएलमुळे आणखी एका युवा खेळाडूचे त्याच्या आवडत्या खेळाडूला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

आयपीएलमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष होते. धोनीला फारशा धावा करता आल्या नाहीत. तो १७ चेंडूत केवळ १८ धावा करू शकला. त्याला युवा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने बाद केले. धोनीसारख्या महान खेळाडूला बाद केल्याचा आनंद सकारियाच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच्यासाठी ही विकेट खूप खास ठरली, कारण असंख्य भारतीयांप्रमाणेच तोसुद्धा धोनीचा मोठा चाहता आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना संपल्यानंतर सकारियाला धोनीला भेटण्याची आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. हा फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्टही केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by CHETAN SAKARIYA (@sakariya.chetan)

- Advertisement -

तुझ्यासारखा खेळाडू पुन्हा घडणार नाही

अगदी माझ्या लहानपणापासून मी तुझा चाहता आहे आणि आज मला तुझ्यासोबत खेळण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे आणि मी हे कधीही विसरू शकणार नाही. तुझ्यासारखा खेळाडू पुन्हा कधीही घडणार नाही. आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल तुझे आभार, असे सकारियाने धोनीसोबतच्या फोटोखाली म्हटले. सकारियाने या सामन्यात धोनीसह अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांनाही बाद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -