घरताज्या घडामोडीकोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधण्याची वणवण थांबणार, DRDO ने शोधला नवा मार्ग

कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधण्याची वणवण थांबणार, DRDO ने शोधला नवा मार्ग

Subscribe

कोरोनाबाधितांसाठी बेस्ट पर्याय DRDOने शोधला

कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक दिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यादरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO- Defence Research and Development Organisation)ने कोरोनामुळे बिकट होणारी परिस्थिती पाहता SpO2 (Blood Oxygen Saturation) पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली तयार केली आहे.

कोरोनाबाधितांसाठी बेस्ट पर्याय उपलब्ध

हा पर्यायचा वापर अधिक उंच असलेल्या भागांमध्ये जिथे ऑक्सिजनची उपलब्धता कमी असते, तिथे तैनात असलेल्या सैनिकांसाठी केला जाऊ शकतो. एवढंच नाहीतर कोरोनाबाधित रुग्णांसाठी हा पर्याय खूप उपयुक्त ठरेल. कोरोना रुग्णांमध्ये श्वास घेण्यास मोठी अडचण निर्माण होतेय आणि त्यामध्ये ऑक्सिजनची पातळी देखील कमी होतेय.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘कोरोनाच्या या संकटात ही स्वयंचलित प्रणाली वरदान ठरू शकते. DRDO बंगळुरूचे डिफेन्स बायो-इंजिनिअर अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीने (DEBEL) हा पर्याय विकसित केला आहे. यामध्ये लावले सिस्टिम SpO2 एक लेव्हल सेट करत एखाद्या व्यक्तीला हायपोक्सियाच्या स्थितीत जीव वाचवतो.

- Advertisement -

हायपोक्सिया म्हणजे काय?

जेव्हा शरीराच्या ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ऊतींपर्यंत (tissue) पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तेव्हा त्या अवस्थेला हायपोक्सिया असे म्हणतात. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णांमध्ये अशी स्थिती होत आहे आणि यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.

सध्या देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. काही अशी प्रकरणे समोर आली आहेत, जिथे रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी खूप कमी होत आहे. मग त्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते. कोणतीही सामान्य व्यक्ती DRDOने शोधलेली ही सिस्टिम (Oxygen Cylinder Option) वापरू शकते. एवढेच नाही तर डॉक्टरांच्या देखरेखीचे कामही हलके केले होऊ शकते.


हेही वाचा – Coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -