घरपालघरमोखाड्यात भीषण पाणी टंचाई; ४४ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा

मोखाड्यात भीषण पाणी टंचाई; ४४ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा

Subscribe

ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने मोखाड्यात पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्यस्थितीत मोखाड्यात ४४ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने मोखाड्यात पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्यस्थितीत मोखाड्यात ४४ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी मोखाड्यात पाऊस कमी झाल्याने आणि ऊन्हाच्या तिव्रतेमुळे टंचाईग्रस्त गावपाडे शंभरी पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे.

’नेमेची येतो पावसाळा’ या ऊक्ती प्रमाणे मोखाड्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते. त्याला हे वर्षही अपवाद नाही. यंदा मोखाड्यात डिसेंबर २०२० पासून म्हणजे दोन महिने अगोदरच टंचाईला सुरूवात झाली आहे. सध्यस्थितीत मोखाड्यात ४४ गावपाड्यांना१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढत आहे. त्यातच गेल्यावर्षी जिल्ह्यात केवळ८० टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस मोखाडा तालुक्यात झाल्याने आणि भूजल पातळी कालवल्याने, मोखाड्यातयंदा टंचाईग्रस्त गावपाडे शंभरी पार करणार असल्याचा प्राथमिक अंदाज पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या अहवालानुसार गेल्यावर्षीचे पर्जन्यप्रमाण –

  • डहाणू – २२५४ मी.मी.
  • जव्हार – २२९६ मी.मी..
  • मोखाडा – १८३१मी.मी. (जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस)
  • पालघर – २२७३मी.मी.
  • तलासरी – २२७३मी.मी.
  • वाडा – २२३९ मी.मी..
  • वसई – २७२०मी.मी.
  • विक्रमगड – २४८०मी.मी.

पाणी टंचाईत प्रशासन सज्ज
पालघर जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ही कंबर कसली आहे. जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कंत्राटदारांना ठेका देण्यात आला आहे. तर मोखाड्यातील १०३ गावपाड्यांसाठी दोन कोटी रूपयांच्या टंचाई आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, विहीरी खोलीकरण, इंधन विहीरी बांधणे, हातपंप बसवणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, या कामांना टंचाई आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona Virus: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -