घरमनोरंजनगोंडस तैमुर अली खानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल!

गोंडस तैमुर अली खानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका मुलगा तैमूर याचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर हा सध्या लोकप्रिय स्टार किड आहे. त्याच्या गोंडस दिसण्यामुळे आणि निरागस हास्यामुळे तो कायमच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो.

सध्या बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल प्रमाणे त्यांची मुलंसुद्धा कायम चर्चेत असतात. याच स्टार किडमध्ये सगळ्यात आघाडीवर आहे, तो सैफ-करिनाचा लाडका तैमुर अली खान. तैमुर सगळ्या सेलिब्रिटींमध्ये कायमच भाव खाऊन जातो. त्याची प्रत्येक हालचाल आपल्या कॅमेऱ्यात टिपायला सगळे कायमच पुढे सरसावतात. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.

 

View this post on Instagram

 

This is so cute ❤️ ❤️ ❤️ #taimuralikhan playing today with dad #saifalikhan ? @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नुकताच तैमुरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तैमुर फुटबॉल खेळताना दिसतोय. या व्हिडिओत तैमुर नेहमीप्रमाणेच गोंडस दिसतोय. सगळे ज्याप्रामाणे बॉलच्या मागे धावतात, त्याचप्रमाणे तैमुरही बॉल पकडायला धावत आहे. यावेळी तैमुरने हिरव्या रंगाचा टीशर्ट आणि पांढरी हाफ पॅंट घातली आहे. तैमुरच्या आजूबाजूला काहीजण बॅडमिंटन खेळत आहेत. पण तैमुर मात्र फुटबॉल खेण्यात रमला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओबरोबर आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तो म्हणजे सैफ अली खान आणि तैमुर यांचा कठड्यावर बसून बॅडमिंटन बघतानाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघून असं लक्षात येतय की, सैफ अली खान आपल्या व्यस्त शेड्युलमधून लाडक्या मुलांसाठी वेळ काढतो आणि तैमुरबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -