घरक्रीडाIPL 2021 : मुंबईविरुद्ध पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय; रवी बिष्णोईला संधी  

IPL 2021 : मुंबईविरुद्ध पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय; रवी बिष्णोईला संधी  

Subscribe

मुंबईच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यंदा मुंबईचा हा चेन्नईतील पाचवा आणि अखेरचा सामना आहे. याआधीच्या चारही सामन्यांत मुंबईने प्रथम फलंदाजीच केली होती. त्यामुळे आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच घेतली असती, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मुंबईच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईकडे क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट हे तीन परदेशी खेळाडू आहेत.

पंजाब विजयाच्या शोधात

दुसरीकडे पंजाबचा संघ विजयाच्या शोधात आहे. त्यांना यंदा चार पैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे. मागील सामना त्यांनी चेन्नईतच खेळला होता आणि त्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या हातून त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी पंजाबने संघात एक बदल केला आहे. मुरुगन अश्विनला संघातून बाहेर करत पंजाबने युवा लेगस्पिनर रवी बिष्णोईला संधी दिली आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -