घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काय कळतं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काय कळतं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

“मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयाने निर्णय दिला. या निर्णयामुळे मराठा समाजाला दुखःद धक्का बसला आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचं कारण हे केवळ तीन पक्षाचं सरकार आणि मुख्यमंत्री आहेत. आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ लावणारा आहे. राज्य सरकार या प्रश्नात कमी पडले. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. मी शिवसेनेत ३९ वर्षे होते. मला माहिती आहे की शिवसेनेसह शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यांना आज मनापासून आनंद झाला असेल”, असा आरोप नारायण राणे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना राणेंनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काय कळतं? असे म्हणत उद्धव ठाकरेंना सवाल देखील विचारला.

मराठा समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना राणे म्हणाले, आजच्या न्यायलयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज मनापासून आनंद झाला असेल. मुख्यमंत्र्यांना कायद्यामधलं काय कळतं? आरक्षणाबद्दलच्या गोष्टींमध्ये कशाशी काय खातात, हे तरी उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का? असा खळबळजनक आरोप करून राणेंनी सवाल उपस्थितीत केला. मराठा समाजाच्या विरोधात वातावरण गेल्यानतंर सध्या राज्यात नाराजीचा सूर आहे. आपल्यावर अन्याय झाला या भूमिकेतून सर्वच लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. परंतु मराठा समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी आणि खेदजनक आहे, असंही राणे म्हणाले.

- Advertisement -

मराठा समाजाच्या अपेक्षांचा अनादर

यासह राणे असेही म्हणाले की, ज्या समाजाने आतापर्यंत इतर समाजांना आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाचं काम केलं. त्यांनाच आज आरक्षण नाकारण्यात येतंय. जर आज राज्यात मराठा समाजाचा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता. मराठा समाजाच्या अपेक्षांचा अनादर झाला. मराठा आरक्षणासंदर्भातील लढा आजही संपलेला नाही. मराठा समाज लढा सुरु ठेवेल. काही जण बाहेरुन आरक्षण देतोय, असं दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू, असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -