घरताज्या घडामोडीsputnik light ला केंद्र सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी

sputnik light ला केंद्र सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी

Subscribe

रशियाच्या स्पुटनिक व्हीने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आणि स्पुटनिक व्ही लसीचा आणखी एक प्रकार विकसित झाल्याचे समोर आले. स्पुटनिक लाईट असे या लसीचे नाव असून त्याचा एक डोस पुरेसा असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आज केंद्र सरकारने स्पुटनिक व्हीच्या लाईट व्हर्जनला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. सध्या ज्या लसी दिल्या जात आहेत, त्याचे प्रत्येकी दोन डोस घेणे गरजेचे आहे. मात्र स्पुटनिक लाईट लसीचा एकच डोस पुरेसा असणार आहे.

रशियाकडून विकसित करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस भारतामधील हैदराबादमध्ये स्थित असलेल्या रेड्डीज लॅबोरिटीमध्ये तयार केली जात आहे. अडीच कोटी स्पुटनिक व्ही लसीचे डोस भारतीयांसाठी तयार केले जात आहेत. काही दिवसांमध्ये ते उपलब्ध होतील. पण आता स्पुटनिक लाईट लसीला केंद्राने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या जो लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे, त्यामध्ये आता दिलासा मिळणार आहे. तसेच या मंजुरीमुळे लसीकरणाला वेग वाढणार आहे.

- Advertisement -

स्पुटनिक लस उत्पादन घेणाऱ्या रशियाच्या कंपनीने असा दावा केला की, स्पुटनिक व्हीचा लाईट व्हर्जनचा एक डोस ८० टक्क्यांपर्यंत प्रभावी असून दोन डोस घेणाऱ्या लसींपेक्षा जास्त असरदार आहे. रशियाच्या सरकारकडून स्पुटनिक लाईटच्या वापरासाठी मान्यता मिळाली आहे. दरम्यान स्पुटनिक व्हीच्या ट्वीटरवर सांगितले की, स्पुटनिक लाईटचा वापर करून लसीकरण वेगाने केले जाऊ शकते आणि यामुळे कोरोना पीक नियंत्रित आणण्यास मदत होईल.


हेही वाचा – Covid-19 Third Wave:..तरच रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -