घरताज्या घडामोडीअभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कोरोनाचे सावट, एक वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह तर शिल्पाची...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कोरोनाचे सावट, एक वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह तर शिल्पाची टेस्ट निगेटिव्ह

Subscribe

मागचे दहा दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या कचाट्यात आतापर्यंत अनेक कलाकार सापडले आहेत. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू देखिल होत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकतच तिच्या सोशल मीडियावर वरुन आपले संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिली. कुटुंबात केवळ शिल्पाची चाचणी निगेटिव्ह आली होती. सासू सासरे, पती, मुलगा यांच्यासह तिच्या एक वर्षाच्या मुलीला देखिल कोरोनाची लागण झाली होती. मागचे दहा दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते असे म्हणत शिल्पा एक पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

- Advertisement -

शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘मागचे दहा दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते. माझे सासू सासरे, ८ वर्षांचा मुलगा वियान, पती राज, १ वर्षांची मुलगी समीशा आणि माझी आई कोरोना पॉझिटिव्ह आहेत. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सरकारच्या सर्व गाईडलाइन्स पाळत आम्ही घरीच आपल्या आपल्या खोल्यांमध्ये स्वत:ला आयसोलेट करन घेतले आहे. डॉक्टरांचे योग्य उपचार घेत आहोतट, असे शिल्पाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिल्पाने पुढे असे म्हटले आहे की, टमाझी टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी मी सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहे. BMC आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची आभारी आहे’. त्याचबरोबर शिल्पाने सर्वांना मास्क लावण्याचे आवाहनही केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह नसाल तरी मानसिकरित्या पॉझिटिव्ह रहा असे शिल्पाने म्हटले आहे. शिल्पाच्या घरातील दोन हाऊस स्टॉफची टेस्टही पॉझिटिव्ह आल्याचे शिल्पाने सांगितले आहे. त्यांना योग्य उपचार दिले जात आहे. देवाच्या कृपेने तेही लवकर बरे होतील,असे शिल्पाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -