घरक्राइमदुबईचे पार्सल पोहचले डोंबिवलीत, एकाला अटक

दुबईचे पार्सल पोहचले डोंबिवलीत, एकाला अटक

Subscribe

दुबई येथे पाठवलेले पार्सल डोंबिवलीत पोहचले आणि तेथून ते पार्सल मलबार हिल पोलिसांच्या हाती लागल्याने प्रकार उघडकीस आला

रमजान ईद हा सण जवळ आल्यामुळे दुबईत असणाऱ्या मुलाला मिठाई, कपडे, सोन्याचे ब्रेसलेट गिफ्ट एका बॉक्स मध्ये पॅकिंग करून एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनी मार्फत दुबई येथे पाठवलेले पार्सल डोंबिवलीत पोहचले आणि तेथून ते पार्सल मलबार हिल पोलिसांच्या हाती लागल्याने प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा घाटकोपर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

घाटकोपर पश्चिम येथे राहणारे मोहम्मद कुरेशी यांचा मुलगा तारिक हा मागील दोन वर्षांपासून दुबई येथे राहण्यास आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु असल्यामुळे तारिक हा रमजान ईदला भारतात येऊ शकत नसल्यामुळे वडिलांनी सणासाठी त्याला मिठाई, कपडे आणि इतर वस्तू मुंबईतून पाठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीचा इंटरनेटवर शोध घेतला असता त्यांना जस्ट डायल वरून आरटीक इंटरनॅशनल कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळून आला.

- Advertisement -

मोहमंद यांनी त्या क्रमांकावर फोन केला करून पार्सल पाठ्वण्याबाबत तसेच त्याचे चार्जेस किती होतील या बाबत माहिती मिळवली. त्यानंतर दुबईत असणाऱ्या मुलासाठी मिठाई, घरात बनवलेले पदार्थ कपडे सोन्याचे ब्रेसलेट चे पार्सल तयार करून पाठवले. मात्र ते पार्सल दुबईला ना पोहचता डोंबिवलीतील एका पत्यावर गेले. पार्सल मिळाले का म्हणून मोहम्मद यांनी मुलाला दुबई येथे फोन केला असता त्याने अजून पार्सल मिळाले नसल्याचे सांगितले. दरम्यान मोहम्मद यांनी कुरिअर कंपनीला फोन केला असता त्याचा फोन लागला नाही. तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या कुरिअर बॉय ला फोन केला असता त्याने ते पार्सल डोंबिवलीच्या पत्त्यावर एका व्यक्तीच्या हातात दिल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच मोहम्मद यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दोन दिवसापूर्वी हे पार्सल मलबार हिल पोलीस ठाणे व्हाया डोंबिवली येथे पोंहचले आणि मलबार हिल पोलीसानी घाटकोपर येथे राहणारे मोहम्मद यांना फोन करून बोलावून घेतले. या पार्सल सोबत पोलिसांनी एकाला अटक केली होती. विक्रांत सिंग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते व तो आर्टिक नावाची बोगस कुरिअर कंपनी चालवत असल्याची माहिती पोलिसांनी मोहम्मद यांना दिली. लोकांचे पार्सल घेऊन त्याच्याकडून पैसे घेऊन विक्रांत सिंग हा पार्सलसह गायब होत असे अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने मलबार हिल याठिकाणी याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे सांगण्यात आले. मलबार हिल पोलीसानी विक्रांत याचा ताबा घाटकोपर पोलिसांना दिला असून घाटकोपर पोलीसानी विक्रांत सिंग याला फसवणुकीच्या गुन्हयात अटक करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – दररोज कॉलवर बोल नाही तर, तुझा सोशल मीडियावर हात धरल्याचा फोटो व्हायरल करेन

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -