घरमनोरंजनइस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबद्दल दुख: व्यक्त करत नोरा फतेही म्हणाली, हे सर्व अमानवीय...

इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबद्दल दुख: व्यक्त करत नोरा फतेही म्हणाली, हे सर्व अमानवीय…

Subscribe

जगातील सर्व सरकारला विनंती करत पॅलेस्टाईनच्या मानवअधिकाराची सुरक्षा करण्याचा आग्रह केला आहे. तसेच हे युद्ध जगातील प्रत्येक क्षेत्राला लोकांना प्रभावित करत असल्याचे नोरा म्हणाली.

तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा इस्त्रायल आणि पॅलेस्टाई पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. सतत हवाई हल्ले ,गोळीबार, अनेक तोफा एकमेकांसमोर डागल्या जात आहेत पुन्हा एकदा या दोघांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2014 मध्ये या दोघांमध्येजवळ जवळ 50 दिवस युद्ध चाललं होतं. आता काही दिवसांपूर्वीच पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर रॉकेटने हल्ला केला. एकावेळी काही मिनिटातच 1500 क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागण्यात आली. त्यात इस्रायलचे 200 नागरिक जखमी झाले. तर 45 हून अधिक जण ठार झाले. जगभरात कोरोना महामारी सारखी गंभीर स्थिती असताना इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये होणार्‍या या युद्धाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने सोशल मीडियावर आपले मत मांडत दुख: व्यक्त केलं आहे. कशा प्रकारे लोकांना त्रास दिला जात आहे. तसेच मनवधिकार बद्दल एलजीबीटी,महिलांचा अधिकार अशा अनेक सामाजिक मुद्द्यांवर तिने स्वत: चे मत प्रकट करत इंस्टास्टोरी पोस्ट केली आहे. नोराने पॅलेस्टाईनचे समर्थन केलं आहे.

- Advertisement -

पोस्टमध्ये नोरा लिहते की, “कोणालाही हे निवडण्याचा अधिकार नाही की कोणाचे मानवी अधिकार इतरांच्या तुलनेत अधिक महत्वाचे आहे. या कठीण काळात पॅलेस्टाईन सोबत एकत्र एकजूट होऊन उभे राहायला हवे. रमजानच्या पवित्र महिन्यात जिथे महामारीने भयंकर रूप धारण केले आहे तिथे एकमेकाची साथ ही अत्यधिक महत्वपूर्ण आहे. लोकांना जाणून बुजून बाहेर पडण्यास प्रवृत केले जात आहे. अनेक सेना त्यांच्यावर हल्ला करत आहे. हे सर्व अमानवीय आहे.” शेवटी नोरा ने लोकांना तसेच जगातील सर्व सरकारला विनंती करत पॅलेस्टाईनच्या मानवअधिकाराची सुरक्षा करण्याचा आग्रह केला आहे. तसेच हे युद्ध जगातील प्रत्येक क्षेत्राला लोकांना प्रभावित करत असल्याचे नोरा म्हणाली.

 

- Advertisement -

हे हि वाचा – मुकेश आणि महेश भट्ट यांच्या व्यावसायिक दूरव्याबद्दल इम्रान हशमीने केला खुलासा म्हणाला…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -