घरताज्या घडामोडीभारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी, AEFI ने आरोग्य...

भारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी, AEFI ने आरोग्य मंत्रालयाला सादर केला अहवाल

Subscribe

भारतात कोरोना लसीकरणानंतर रक्तस्राव होणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रकरणे फार कमी

 

जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. लसीचे अनेक साइड इफेक्ट आपल्या समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे त्याचप्रमाणे रक्तस्राव होण्याची प्रकरणेही दिसून आली. या साइड इफेक्टमुळे लोकांच्या मनात लसीविषयी भिती निर्माण झाली होती. मात्र भारतात कोरोना लसीकरणानंतर रक्तस्राव होणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रकरणे फार कमी आहेत असा अहवाल राष्ट्रीय AEFIV समितीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला सादर केला आहे. ११ मार्चला करण्यात आलेल्या लसीकरणानंतर एम्बोलिक आणि थ्रोम्बोटिक इव्हेंट्स विषयी काही देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. विशेषत: अँस्ट्रॅजेनेकाची ऑक्सफोर्ड लस म्हणजेच भारतातील कोविशिल्ड लस घेतलेल्यांना. जगात निर्माण या घटनेमुळे भारतातील घटनांचे सखोल विश्लेषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

राष्ट्रीय AEFIV समितीने असे नमूद केले आहे की, ३ एप्रिलपर्यंत ७५,४३५,३८१ लसीचे डोस देण्यात आले. ज्यात कोव्हिशिल्ड लसीचे ६८,६५०,८१९ आणि कोव्हॅक्सिनचे ६,७८४,५६२ डोस होते. यातील ६५,९४४,१०६ पहिला डोस आणि ९,४९१,२७५ दुसरे डोस होते. कोरोना लसीकरण मोहिम सुरु केल्यानंतर देशातील ७५३ जिल्ह्यांपैकी ६८४ जिल्ह्यांमध्ये कोविन प्लॅटफॉर्मवरुन लसीकरण करण्यात आले. यापैकी ७०० केस गंभीर स्वरुपाची नोंदवण्यात आली. AEFIV समितीने ४९८ केसेचा निट आढावा घेतला असता त्यातील २६ केसेसमध्ये संभाव्य थ्रोम्बोइम्बोलिक धोका असल्याचे सांगितले.

भारतातील AEFIVची आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, भारतात थ्रोम्बोइम्बोलिक घटनांचा फार कमी धोक आहे. कोरोना लस घेतल्यानंतर २० दिवसांनी दिसणाऱ्या या संशयीत थ्रोम्बोइम्बोलिकच्या लक्षणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एमओएचएफडब्ल्यू हेल्थकेअर काही सल्ला दिला आहे.

- Advertisement -

छातीत दुखणे,हातपाय दुखणे, त्वचा लाल होणे,उलट्या होणे किंवा सतत पोटात दुखणे,डोकेदुखी,अशक्तपणा येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा अवयवला लखवा मारणे, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत उलट्या होणे, त्याचप्रमाणे डोळे दुखणे, धुरकट दिसणे,मानसिक स्थिती बदलणे,गोंधण होणे,नैराश्य येणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसल्यास ती चिंताजनक असू शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

भारतात कोव्हिशिल्ड लसीमध्ये संसर्ग टाळण्यासाठी आणि मृत्यूची संख्या कमी करण्याची प्रचंड क्षमता आहे. कोव्हिशिल्ड लसीचे आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. भारतात २ एप्रिल २०२१ पर्यंत १३.४कोटींहून अधिक कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यात आले आहेत.


हेही वाचा – Post covid-19 diet : सावधान ! कोरोनामुक्तीनंतर भुक वाढलेय ? कारण वाचा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -