घरताज्या घडामोडीTauktae Cyclone: चक्रीवादळाचे मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट !

Tauktae Cyclone: चक्रीवादळाचे मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट !

Subscribe

मुंबईपासून अवघ्या १२० किमी अंतरावर असलेले तोक्ते चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकते आहे खरे, पण चक्रीवादळाने मुंबईकरांना जाता जाता एक रिटर्न गिफ्ट दिले आहे. मुंबईच्या पोटात दररोज मोठ्या प्रमाणात जाणारा कचरा या चक्रीवादळाच्या निमित्ताने पुन्हा मुंबईकरांकडे पाठवण्याची किमया या चक्रीवादळाने केली आहे. दरम्यानच्या काळात मुंबईत भरतीची वेळ ही दुपारनंतर असल्यानेच हा कचरा मुंबईच्या रस्त्यांवर उतरला नाही हेच नशीब. मोठ्या प्रमाणात हा कचरा मुंबईतल्या वरळीतील पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी जमा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मुंबईत दुपारी ३.४४ वाजता भरतीची वेळ होती. तर सर्वात उंच लाट ३.९४ मीटर इतकी आहे. त्यानंतर यामधील काही कचरा रस्त्यावरही पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (huge garbage seen at worli pumping station as a result of Tauktae Cyclone)

वरळीतील लव ग्रुव्ह पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात समुद्राने परतून लावलेला आहे. त्यामध्ये थर्माकॉलपासून ते प्लॅस्टिकच्या पिशव्या, रॅपर्स, प्लॅस्टिक कॅन अशा अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात या पंपिंग हाऊसच्या तोंडावरच जमलेल्या आहेत. परिणामी मुंबईतील काही भागात पाणी साचायलाही सुरूवात झाली होती. मुंबईतील परळ टीटी, हिंदमाता परिसरातही याचाच परिणाम म्हणून पाणी साचलेल पहायला मिळाले. मुंबईत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळेच झाडांची पडझड झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी रस्तेही झाडे कोसळल्यामुळे अडून पडले आहेत. पालिकेच्या यंत्रणेतून ही झाडे हटवण्याचे तसेच रस्त्यावरचा कचरा विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

तोक्ते चक्रीवादळ आता अतिशय शक्तीशाली असे रूप धारण केले असून हे वादळ मुंबईपासून पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली. आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. आज सोमवारी रात्री ८ ते ११ या कालावधीत हे चक्रीवादळ गुजरातला धडकेल अशीही माहिती त्यांनी दिली. कुलाबा येथे १०२ किमी वेगाने वारे नोंदवण्यात आले आहेत. रायगडसाठी रेड अलर्ट येत्या २४ तासांमध्ये मुंबईतही काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांमध्ये वादळाचा वेग कमी होईल. तर या कालावधीत काही ठिकाणी पावसाचीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -