घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: राज्यात हवामान अचूक अंदाज देणाऱ्या ४ डॉप्लर रडारपैकी ३ रडार...

Cyclone Tauktae: राज्यात हवामान अचूक अंदाज देणाऱ्या ४ डॉप्लर रडारपैकी ३ रडार नादुरुस्त, हवामान तज्ज्ञांचा आरोप

Subscribe

IMDचे मुंबई रडार सध्या बंद

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कोकणासोबतच आता मुंबईलाही मोठा धक्का बसला आहे. किनारपट्टी भागाव्यतिरिक्त अनेक भागात ताशी १८ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. राज्यात हवामानात होणाऱ्या बदलांचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी ४ डॉप्लर रडार आहेत. मात्र तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीच्यावेळी राज्यातील ४ डॉप्लर रडारपैकी ३ रडार नादुरुस्त असल्याचा आरोप हवामान तज्ज्ञ किरणकुमार जौगरे यांनी केला आहे. ( Out of 4 Doppler radars 3 radars are not working in Cyclone Tauktae) याबाबत त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालायाला सूचित केले असल्याची माहिती दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर मोठी आपत्ती ओढवू शकते. IMDचे मुंबई रडार सध्या बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रीवादळाच्या वेळी मुंबई रडार बंद पडल्याने सध्या केवळ सॅटेलाईट इमेजवर अवलंबून रहावे लागत आहे. यामुळे रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पट्ट्यातील हवामान खात्याचा अचूक अंदाज घेणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. अरबी समुद्रात अतितीव्र तौक्ते चक्रीवादळ निर्माणे झालेले असताना  दुपारी १:२६ वाजताच्या नंतर IMD मुंबईच्या रडावर कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई रडारचे फोटो IMDने खुल्या केल्या होत्या मात्र त्या योग्य प्रकारे काम करत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या ताशी १०२ किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत आज सकाळी ११: ३० पर्यंत ७९.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रूझ येथे ४४.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तासात वाऱ्याचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा – बीकेसी कोविड सेंटरला तौत्के वादळाचा तडाखा, पालिकेने रातोरात रुग्णांना हलवल्याने अनर्थ टळला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -